Dunki Vs Salaar Advance Booking Day 1: 2023 या वर्षात रिलीज झालेल्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अॅनिमल (Animal) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता प्रेक्षकांच्या 2023 या वर्षाचा शेवट देखील मनोरंजनानं होणार आहे. अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) आणि प्रभासच्या (Prabhas) सालार (Salaar: Part 1 – Ceasefire) हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. या चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगला देखील सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात या दोन्ही चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगबाबत...


'डंकी' आणि 'सालार' च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात


बॉक्स ऑफिसवर 'डंकी' आणि 'सालार' यांच्यात काटे की टक्कर होणार आहेच, त्याआधी शाहरुख आणि प्रभासच्या चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात केली आहे. प्रभासच्या सालार आणि शाहरुखच्या डंकी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टफ कंप्टीशन होत आहे. 


 Sacnilk च्या अर्ली ट्रेंडनुसार डंकी या चित्रपटानं आतापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये  4.71 कोटींची कमाई केली आहे.  या चित्रपटाची आतापर्यंत 152036 तिकिटं बुक झाली आहेत. तर सालार या चित्रपटानं आतापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये  3.86  कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत सालारची 159897 तिकिटं विकली गेली आहे. सध्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये शाहरुखचा डंकी हा प्रभासच्या सालारला कलेक्शनबाबत मागे टाकताना दिसत आहे. पण आता हे दोन्ही चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी कोणता चित्रपट जास्त कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


कधी रिलीज होणार सालार आणि डंकी? (Salaar And  Dunki Release Date)


 21 डिसेंबर रोजी  डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहेत. तसेच सालार हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. डंकी या चित्रपटाचं दिग्दर्शन  राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत  तापसू पन्नू, बोमन ईरानी आणि विकी कौशल यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तर सालार या चित्रपटात प्रभाससोबत  पृथ्वीराज,श्रुती हासन,जगपती बाबू, टिन्नू आनंद, ईश्‍वरी राव, श्रिया रेड्डी आणि रामचंद्र राजू यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सालार आणि डंकी या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


Dunki First Day Advance Booking: किंग खानच्या 'डंकी' चा बॉक्स ऑफिसवर डंका; अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी केली एवढी कमाई