Koffee With Karan 8: बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक  करण जोहरचा (Karan Johar) सर्वात लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan 8) हा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचा सध्या आठवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कॉफी विथ करण-8 च्या पहिल्या सीझनमध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी हजेरी लावली. या एपिसोडमध्ये रणवीर आणि दीपिका यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं. अशातच आता सोशल मीडियावर कॉफी विथ करण या कार्यक्रमात दीपिकानं केलेल्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे.


दीपिकाने कॉफी विथ करणमध्ये तिच्या आणि रणवीरच्या नात्याबद्दल सांगितलं ती म्हणाली की   'मला काही दिवस सिंगल रहायचे होते कारण मी अत्यंत कठीण  रिलेशनशिपमधून बाहेर पडले होते. मला कोणाशी कमिटेड रहायचे नव्हते. सुरुवातीला मी रणवीरसोबतही सीरियस नव्हते. पण जेव्हा त्याने मला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा मी सीरियस झाले. जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा मी इतर काही लोकांना देखील भेटायचे, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे पण नंतर मी पुन्हा रणवीरकडेच येत होते.'


दीपिकानं तिच्या आणि रणवीरच्या रिलेशनशिपबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे सध्या नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांना रणवीरवर दया देखील आली. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "तर क्विन दीपिकाने कबूल केले की, ती रणवीरला डेट करताना इतर लोकांबद्दल देखील विचार करत होती" तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं,  "जेव्हा दीपिका नात्याबद्दल बोलत होती तेव्हा रणवीरच्या डोळ्यात वेदना दिसत होत्या.  मला रणवीरबद्दल वाईट वाटते."










दीपिका आणि रणवीरच्या लग्नासोहळ्याचा व्हिडीओ देखील कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर करण जोहर हा इमोशनल झालेला दिसला. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Deepika Padukone And Ranveer Singh: डान्स, इमोशन्स अन् रोमान्स; दीपवीरच्या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल