Koffee With Karan 8:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक  करण जोहरचा (Karan Johar) सर्वात लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan 8) हा सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कॉफी विथ करण-8  या कार्यक्रमाच्या पहिल्या  एपिसोडमध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमामध्ये  देओल ब्रदर्स हजेरी लावणार आहेत. नुकताच करणनं कॉफी विथ करण  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) हे काही मजेशीर किस्से सांगताना दिसत आहेत. 


 कॉफी विथ करण-8 या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, करण हा सनी देओलचे 'गदर 2' चित्रपटाच्या  यशाबद्दल अभिनंदन करतो. तो म्हणतो, "मला सर्वात आधी तुला स्टँडिंग ओव्हेशन द्यायचे आहे." त्यानंतर करण हा स्टँडिंग ओव्हेशन देतो.


कॉफी विथ करण  या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये पुढे दिसत आहे की, करण हा सनीला त्याच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत विचारतो. तो म्हणतो, "मी तुझ्या काही मुलाखती पाहिल्या आहेत. त्यामध्ये तू म्हणालास की, गदर-2 चे ऑफिस कलेक्शन 'ऑर्गेनिक' आहे. तुला काय वाटतं आम्ही बॉक्स ऑफिसचे आकडे वाढवून सांगतो?" त्यावर सनी देओल म्हणतो, "असे घडत आहे. समाजाची सध्या अशी वाटचाल सुरू आहे." पुढे करण म्हणतो, “म्हणूनच गदर 2 ची टॅगलाइन हिंदुस्थान का असली ब्लॉकबस्टर अशी होती?” करणचे हे बोलणे ऐकल्यानंतर सनी देओल हसतो.


पाहा प्रोमो:






कॉफी विथ करण 8 च्या प्रोमोमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल हे रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनबाबत देखील बोलताना दिसत आहेत.  सनी आणि बॉबी हे 18 वर्षांनंतर कॉफी विथ करण  या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत. त्यांनी याआधी 2005 मध्ये कॉफी विथ करण  या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती.


इतर महत्वाच्या बातम्या:


Koffee With Karan 8: 'कॉफी विथ करण' मधील दीपिकाच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा; नेटकऱ्यांना रणवीरवर आली दया, म्हणाले, "त्याच्या डोळ्यात वेदना दिसतायत"