Ankush Chaudhari And Deepa Parab Love Story: अभिनेत्री दीपा परब (Deepa Parab) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दीपानं या चित्रपटामध्ये चारु ही भूमिका साकारली. अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) हा दीपा परबचा पती आहे. अनेकांना दीपा आणि अंकुशच्या लव्ह स्टोरीबाबत माहित नसेल. जाणून घेऊयात दीपा आणि अंकुशच्या लव्ह स्टोरीबाबत...
अंकुशनं फिल्मी स्टाईलनं दीपाला केलं प्रपोज
काही महिन्यांपूर्वी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये अंकुश आणि दीपा यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अंकुशनं एक किस्सा सांगितला होता.अंकुश म्हणाला, 'आम्ही एमडी कॉलेजला होते. कॉलेजमध्येच आमची ओळख झाली होती. आमचं कॉलेज लोअर परळच्या पुलाजवळ होतं आणि ती पुलावरून चालत होती. लोअर परळच्या ब्रिजवर भर दिवसा, गर्दी असताना मी तिच्यामागे गेलो होते, त्यानंतर तिच्या समोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं होतं.'
अंकुश आणि दीपा यांनी 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. दीपा आणि अंकुश यांना प्रिन्स चौधरी हा मुलगा आहे. दीपा अनेक वेळा अंकुश आणि प्रिन्स यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
दीपा आणि अंकुश यांचे चित्रपट
दीपानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बिंधास्त, अंड्याता फंडा या चित्रपटांमध्ये दीपानं काम केलं आहे. दीपानं शौर्य और अनोखी की कहानी, कभी कभी या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. तसेच 'तू चाल पुढं' (Tu Chal Pudha) या मराठी मालिकेत देखील दीपानं काम केलं आहे. तर अंकुश हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वी अंकुशचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. धुराळा, दगडी चाळ-2, दुनियादारी, लालबाग परळ, क्लासमेट्स, डबल सीट यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये अंकुशनं काम केलं आहे. तसेच त्यानं आभाळमाया,बेधुंद मनाच्या लहरी या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: