Deepa Parab: छोट्या पडद्यावरील ‘तू चाल पुढं’ (Tu Chal Pudha) या मालिकेमध्ये दीपा परबनं (Deepa Parab) अश्विनी ही भूमिका साकारली आहे. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दीपा ही बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिनं चारु ही भूमिका साकारली आहे. ‘तू चाल पुढं’ मालिकेतील अश्विनीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात ‘तू चाल पुढं’ या मालिकेमधील दीपाच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनरबाबत...


 अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) हा दीपा परबचा पती आहे. दीपा आणि अंकुश यांचा  प्रिन्स चौधरी हा मुलगा आहे. दीपा अनेक वेळा अंकुशसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.






काही दिवसांपूर्वी अंकुशचा  महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. अंकुशनं या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.


धुराळा, दगडी चाळ-2, दुनियादारी, लालबाग परळ, क्लासमेट्स, डबल सीट यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये अंकुशनं काम केलं आहे. तसेच त्यानं  आभाळमाया,बेधुंद मनाच्या लहरी  या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. अंकुशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यानं  जिस देश मे गंगा रहता है या हिंदी चित्रपटामध्ये काम केलं आहे.


दीपाचे चित्रपट


 बिंधास्त, अंड्याता फंडा या चित्रपटांमध्ये दीपानं काम केलं आहे. आता तिचा बाईपण भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दीपानं  शौर्य और अनोखी की कहानी, कभी कभी या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. दीपा परबने जवळपास 14 वर्षानंतर पुन्हा एकदा 'तू चाल पुढं' (Tu Chal Pudha) या मालिकेच्या माध्यमातून मराठीत कमबॅक केलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Tu Chal Pudha : 'तू चाल पुढं' मालिकेत पार पडणार 'मिसेस इंडिया 2023' ग्रॅन्ड फिनाले; दीपा परबचा ग्लॅमरस अंदाज