Commando Trailer Out: अभिमेत्री आदा शर्माच्या (Adah Sharma) 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता अदा कमांडो (Commando) या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच कमांडो या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अदा शर्माचा अॅक्शन अंदाज दिसत आहे. 

विपुल अमृतलाल शाह यांच्या 'कमांडो' या अॅक्शन सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या  अॅक्शनपॅक्ड सीरिजचा ट्रेलर Disney Plus Hotstar ने त्यांच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि दिग्दर्शित 'कमांडो' या सीरिजच्या ट्रेलरमध्ये  प्रेम पारिजा, अदा शर्मा, वैभव तत्ववादी हे कलाकार दिसत आहेत.

कमांडो या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, क्षितीज हा एक गुप्तहेर आहे. तो एका देशात गुप्तहेर म्हणून गेला आहे. पण क्षितीजला त्या देशात अटक केली जाते आणि त्याला एका तुरुंगात ठेवण्यात येते. त्यानंतर  विराट आणि भावना रेड्डी हे दोघे क्षितीजला त्या तुरुंगातून सुरक्षित आणण्यासाठी धोकादायक मोहिमेवर निघतात.

'कमांडो' ची स्टार कास्ट

अभिनेता वैभव तत्ववादीनं 'कमांडो' या सीरिजमध्ये 'क्षितीज' ही भूमिका साकारली असून अदा शर्मानं भावना रेड्डी आणि प्रेमनं विराट ही भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये तिग्मांशू धुलिया, अमित सियाल, श्रेया सिंह चौधरी, इश्तियाक खान आणि मुकेश छाबरा हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत.

कधी रिलीज होणार कमांडो?

कमांडो ही वेब सीरिज 11 ऑगस्ट रोजी Disney Plus Hotstar  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'कमांडो' ही वेब सीरिज 'कमांडो' फ्रँचायझीमधील आहे. 'कमांडो' फ्रँचायझीचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. या चित्रपटांची निर्मिती विपुल शाह यांनी केली आहे. कमांडो फ्रँचायझीची सुरुवात 2013 मध्ये 'कमांडो: ए वन मॅन आर्मी' या चित्रपटानं झाली, ज्यामध्ये विद्युत आणि पूजा चोप्रा मुख्य भूमिकेत होते. आता प्रेम आणि अदा 'कमांडो' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या:

The Kerala Story: अदा शर्मानं शेअर केले 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो; म्हणाली, '40 तास...'