Ram Charan On Dance With Salman Khan In Yentamma: बॉलिवूडचा भाईजान  सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटातील काही गाणी रिलीज झाली आहे. या चित्रपटातील  ‘येंतम्मा' या गाण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या गाण्यात सलमान खान, साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि दग्गुबती व्यंकटेश (Daggubati Venkatesh) हे तिघे डान्स करताना दिसत आहे. या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आतापर्यंत जवळपास 43 मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत. राम चरणनं ‘येंतम्मा’गाण्यात डान्स केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील ‘येंतम्मा’ या गाण्यात  राम चरणनं डान्स केला आहे. या गाण्यात डान्स करताना आलेल्या अनुभवाबद्दल त्यानं सांगितलं आहे. 'हे गाणे धमाकेदार आहे, हे सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक गाणं आहे. या गाण्यावर प्रेक्षक डान्स करु शकतात.सलमानसोबत डान्स करायचं माझं स्वप्न होतं, हे स्वप्न आता पुर्ण झालं आहे. हे गाणे शूट करताना मजा आली. खूप खूप धन्यवाद सलमान भाई.  लव्ह यू सो मच.' असं राम चरण म्हणाला.

 'येंटम्मा' हे गाणं पायल देवनं संगीतबद्ध केले आहे. हे गाणं रफ्तार, विशाल ददलानी आणि पायल देव यांनी गायले आहे.  शब्बीर अहमद हे या गाण्याचे गीतकार आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी जानी मास्तर यांनी केले आहे.

कधी रिलीज होणार ‘किसी का भाई किसी की जान’?21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेसोबतच  शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सलमान खानच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Yentamma Song Out : सलमानचा लुंगी अवतार; राम चरण आणि वेंकटेश दग्गुबातीसोबत थिरकला 'Yentamma' गाण्यावर