Laapataa Ladies Official Entry: दिग्दर्शक किरण राव (Kiran Rao) यांचा 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) ऑस्करच्या (Oskar Awards) शर्यतीत दाखल झाला आहे. फिल्म फेडरेशनकडून 29 चित्रपटांमधून ऑस्करसाठी 'लापता लेडीज'ची निवड करण्यात आली आहे. हिंदी 'अॅनिमल', मल्याळम 'आतम'ला बाजूला सारुन लापता लेडीजनं बाजी मारली असून ऑस्करच्या शर्यतीत स्थान पटकावलं आहे. 


दिग्दर्शक किरण रावचा 'लापता लेडीज' हा चित्रपट यावर्षी मार्चमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो समीक्षकांना तसेच लोकांना प्रभावित झाला. फनी कॉमेडीसह समाजातील महिलांच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत ठरलेला चित्रपट आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर सांगितलं की, भारतानं यंदाच्या ऑस्करसाठी 'लापता लेडीज' हाच चित्रपट ऑस्करसाठी पाठवावा. प्रेक्षकांची ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे.


ऑस्करच्या शर्यतीत 'लापता लेडीज'


पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, 'लापता लेडीज', या वर्षीच्या स्लीपर हिटपैकी एक, ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री असेल. भारतीय फिल्म फेडरेशनच्या समितीनं 29 चित्रपटांच्या यादीतून 'लापता लेडीज'ची ऑस्कर 2025 साठी अधिकृत एन्ट्री म्हणून निवड केली आहे. समितीसमोर सादर झालेल्या 29 चित्रपटांच्या यादीत 'ॲनिमल' आणि 'अट्टम' या चित्रपटांचाही समावेश होता.


कोणते 29 चित्रपट ऑस्करसाठी शर्यतीत होते? 



दरम्यान, 'लापता लेडीज'चं पहिलं स्क्रिनिंग गेल्या वर्षी टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालं होतं, जिथे त्याला प्रचंड प्रशंसा मिळाली. किरण रावचा हा चित्रपट मार्च 2024 मध्ये लिमिटेड स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांची उत्तम दाद मिळाली. 5 कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं जगभरात 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 


या उत्कृष्ट चित्रपटासाठी अभिनेते नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांचंही खूप कौतुक करण्यात आलं आहे. महिलांवरील संवेदनशील विषयावर उत्कृष्ट चित्रपट बनवल्याबद्दल किरण राव यांच्या दिग्दर्शनाचंही खूप कौतुक झालं होतं.


आमिरचं 'ते' स्वप्न पूर्ण होणार? 


'लापता लेडीज' सुपरस्टार आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला चित्रपट आहे. फिल्ममेकर किरण राव या चित्रपटात को-प्रोड्यूसर आहे. भारताकडून ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री देण्यात आलेला आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला चौथा चित्रपट आहे. 2001 मध्ये रिलीज करण्यात आलेला 'लगान' आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला पहिला चित्रपट होता. लगान चित्रपट देखील भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aishwarya Rai, Abhishek Bachchan: अभिषेकसोबत वाद झाल्यानंतर सर्वात आधी ऐश्वर्या करते 'हे' काम; दोघांमध्ये सध्या चाललंय काय?