मुंबई : हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दाशियन (Kim Kardashian) अलिकडेच भारतात आली होती. किम कार्दाशियनने उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट याच्या शाही विवाह सोहळ्याला मुंबईतल हजेरी लावली. किम यानिमित्तामे पहिल्यांदाच भारतात आली होती. किम कार्दाशियनने या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये किम कार्दाशियन ट्रेडिशनल अवतारात दिसत आहे. दरम्यान, या फोटोमधील भगवान गणेशाच्या मूर्तीसोबत किमने काढलेल्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. श्री गणेशाच्या मूर्तीसोबतचा (Ganesha Idol) फोटो व्हायरल झाल्यानंतर तिने सोशल मीडियावरुन हा फोटो हटवला आहे.


श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट


किम कार्दाशियन (Kim Kardashian) ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अनंत-राधिकाच्या लग्नातील तिचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये किमने श्रीगणेशाच्या मूर्तीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर सर्वांच्या नजरा आकर्षित झाल्या. नेटकऱ्यांनी श्रीगणेशाच्या मूर्तीसोबतच्या फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर किमने तिच्या इंस्टाग्रामवरील हा फोटो डिलिट केला आहे.


गणपतीच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचा फोटो (Kim Kardashian Ganesha Idol Photo)


मुंबईतील अंबानींच्या लग्नसोहळ्याच किम कार्दाशियनने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या ऑफव्हाईट लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात तिने एक सुंदर फोटोशूट केलं. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "अंबानीच्या लग्नासाठी हिरे आणि मोती". किम कार्दाशियनचा ट्रेडिशनल लूक नेटिझन्सना आवडला, पण तिच्या एका फोटोकडे भारतीय फॉलोअर्सचं लक्ष पडलं. या फोटोमध्ये किम कादार्शियन गणपतीच्या मूर्तीचा फोटो प्रॉप म्हणून वापर करताना दिसत आहे. या फोटोमध्ये किम श्रीगणेशाच्या मूर्तीवर वाकून पोज देताना दिसत आहे. दरम्यान, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर किमने कोणतेही स्पष्टीकरण न देता शांतपणे तिच्या पोस्टवरून फोटो काढून टाकला आहे.


किम कार्दाशियनची इंस्टाग्राम पोस्ट






फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले


गणपतीच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनची अशी पोज आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. किमच्या पोस्टवर कमेंट करत भारतीय नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे. एका यूजरने लिहिले की, "ती अमेरिकेतून आली आहे आणि गणपतीच्या मूर्तीसोबत अशी पोज दिली आहे. तिच्यासाठी याचं महत्त्व नसेल, पण तिने कोणालातरी विचारून हे फोटोशूट करून घ्यायला हवं होतं." आणखी एका युजरने म्हटलं की, 'हिला कुणीतरी सांगा श्री गणेशाची मूर्ती आहे, कोणतं प्रॉप नाही, ज्यासोबत असा फोटो काढता येईल.'दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे, "आपण त्या संस्कृतीशी संबंधित नसताना हे अगदी अयोग्य आणि त्याहूनही अधिक अपमानास्पद आहे".  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Samantha : 'आगीतून बाहेर पडलीय...', घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर समंथाने मौन सोडलं, अवघ्या चार वर्षात मोडला संसार