Kiccha Sudeep : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपनं (Kiccha Sudeep) कन्नड, तमिळ आणि हिंदी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  किच्चा सुदीप हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सध्या तो विक्रांत रोणा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एका मुलाखतीमध्ये किच्चा सुगदीपनं सांगितलं की, एका गावामधील प्रत्येक घरात त्याची पूजा केली जाते. या गावाबद्दल किच्चा सुदीपनं माहिती दिली...


चाहत्यानं काढला होता टॅटू
एका मुलाखतीमध्ये किच्चा सुदीपला विचारण्यात आलं की, तुझ्यासाठी आत्तापर्यंत फॅननं केलेली सर्वात क्रेझी गोष्ट कोणती? या प्रश्नाचं उत्तर देत किच्चा सुदीप म्हणाला, 'एका चाहत्यानं पूर्ण  शरीरावर माझ्या नावाचा आणि फोटोचा टॅटू काढला होता.' पुढे तो म्हणाला, 'एक कुटुंब हे 15 दिवस चालत प्रवास करुन मला भेटण्यासाठी आले होते. ते माझ्याकडून कोणतीही मदत घेण्यासाठी नाही तरी फक्त मला भेटायला आले होते. मी बराच वेळ त्यांच्यासोबत घालवला. त्यानंतर मी त्यांना तिकीट काढून दिले आणि सांगितले की, पुन्हा असं करु नका. '


लोक करतात पूजा 
किच्चा सुदीपनं आणखी एक किस्सा या मुलाखतीमध्ये सांगितला. तो म्हणाला, 'मी पर्फेक्ट नाहीये. मी चुका देखील करतो. काही लोकांनी माझं मंदिर देखील बांधलं आहे. एक असं गाव आहे ज्यामधील प्रत्येक घरात माझा फोटो आहे. या फोटोची लोक पूजा करतात. पण मला या सर्व गोष्टींची भिती वाटते. मला जेव्हा ते लोक भेटण्यासाठी बोलवतात तेव्हा मी घाबरतो. मला हे स्थान नकोय.'


किच्चा सुदीपच्या विक्रांत रोणा या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित आहे. 


हेही वाचा: