Karan Johar : गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपेक्षा टॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं पहायला मिळतंय. पुष्पा, आरआरआर, विक्रम यांसारख्या साऊथ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे आता बॉलिवूड संपुष्टात येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक असणाऱ्या करण जोहरनं  (Karan Johar) बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत सांगितलं. 


काय म्हणाला करण? 
एका मुलाखतीमध्ये करणला प्रश्न विचारण्यात आला की, 'बॉलिवूड संपुष्टात आलंय का? या प्रश्नाला करणनं उत्तर दिलं, 'हे सगळं बकवास आहे. चांगाला चित्रपट चांगली कमाई करतो. गंगूबाई काठियावाडी आणि भूल भूलैय्या-2 या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जुगजुग जियो चित्रपटानं देखील चांगली कमाई केली. चित्रपट जर चांगला नसेल तर तो चांगली कमाई करणारच नाही.'


करण पुढे म्हणाला, 'मला आशा आहे की, बॉलिवूडचे आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतील. मला माहित आहे प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणणे अवघड आहे. पण बॉलिवूड संपुष्टात येईल असं मला वाटत नाही. लाला सिंह चड्ढा, रक्षाबंधन, ब्रह्मास्त्र हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. वर्षाच्या शेवटी सलमानचा देखील चित्रपट येतोय.  '


करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'कॉफी विथ करण 7' मुळे करण सध्ये चर्चेत आहे. करणच्या 'दिलवाले दुल्हिनयां ले जाएंगे' ,  'कुछ कुछ होता है'  'माय नेम इज खान,' स्टूडेंट ऑफ द इयर,' 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


हेही वाचा: