Kiara Advani Siddharth Malhotra January Wedding Truth : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. 'कॉफी विथ करण 7'च्या मंचावर कियाराने त्यांच्या नात्याविषयी उघडपणे भाष्य केलं होतं. आता कियारा आणि सिद्धार्थ येत्या जानेवारी महिन्यात लग्न करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 


सिद्धार्थ आणि माझी मैत्री खास मित्रापेक्षा थोडी जास्त आहे, असं कियारा एका मुलाखतीत म्हणाली. तसेच कियारा आणि सिद्धार्थ लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं याआधी कबीर सिंहदेखील म्हणाला होता. कबीरच्या व्यक्तव्यानंतर त्यांच्या नात्यासंदर्भात अनेक अफवांना सुरुवात झाली आहे. आता जानेवारी महिन्यात ते लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 


कियारा आणि सिद्धार्थ जानेवारी महिन्यात घेणार सात फेरे?


कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अशातच कियारा आणि सिद्धार्थ येत्या जानेवारीत सात फेरे घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार, कियारा आणि सिद्धार्थ जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार नाहीत.


मीडिया रिपोर्टनुसार,कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार ही अफवा आहे. याआधीदेखील नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत तारीख समोर आलेली नाही. 


कियारा आणि सिद्धार्थची पहिली भेट कुठे झाली?


'लस्ट स्टोरीज'च्या व्रॅपअप पार्टीत कियारा आणि सिद्धार्थची पहिली भेट झाली. त्यानंतर 'शेरशाह' सिनेमाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली. या सिनेमात दोघेही मुख्य भूमिकेत होते. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता चाहते त्यांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत. 


कियारा-सिद्धार्थचे आगामी सिनेमे 


कियाराचा 'गोविंदा नाम मेरा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. सध्या कियारा 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राचा 'मिशन मजनू' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो 'योद्धा' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. 


संबंधित बातम्या


Koffee With Karan 7 : कियारा अडवाणीने दिली सिद्धार्थवरील प्रेमाची कबुली, करण जोहरच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली...