The Kashmir Files : 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाताचे ज्यूरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांचं 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाबाबतचं वक्तव्य चांगलचं गाजलं. त्यांच्यावर आता भारतातील इस्त्राइलचे राजदूत नाओर गिलॉन (Naor Gilon) यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी भारतीयांची माफीदेखील मागितली आहे. 






नाओर गिलॉन यांनी ट्वीट केलं आहे,"भारतीय संस्कृतीत पाहुण्यांना देव मानले जाते आणि तुम्ही मात्र तुम्हाला मिळालेल्या मानाचा अपमान केलात. तुमच्या एका विधानाचा भारतीयांना खूप त्रास होत आहे आणि या एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटत आहे". 






नाओर गिलॉन यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे,"मी सिनेक्षेत्रातला तज्ज्ञ नाही. पण ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करून त्यानंतरच त्यावर भाष्य करणं योग्य हे मला ठावूक आहे. भारतीयांनी त्याची किंमत मोजली आहे. त्यामुळेच मी या वक्तव्याचा निषेध करतो".






नाओर गिलॉन पुढे म्हणाले,"भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातात तुम्ही काय म्हणालात याचा इस्त्राइलमध्ये जाऊन एकदा विचार करा. भारत आणि इस्त्राइलचे मित्रत्वाचे संबंध आहेत. तुमच्या एका वक्तव्यामुळे या संबंधाना धक्का पोहोचू शकतो. एक माणूस म्हणून मला या गोष्टीची भीती वाटते त्यामुळे मी भारतीयांची माफी मागतो". 


नदाव लॅपिड काय म्हणाले?


नदाव लॅपिड म्हणाले,"द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचा 'इफ्फी' सारख्या महोत्सवात समावेश होणं ही धक्कादायक बाब आहे. तसेच हा सिनेमा प्रपोगंडा आणि वल्गर सिनेमा आहे".


संबंधित बातम्या


Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाले, आता बनवणार 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'