Bachchan Pandey : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 15 एप्रिलला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
'बच्चन पांडे' सिनेमा भारतासह जगभरातील 240 देशांमध्ये स्ट्रीम होणार आहे. हा सिनेमा ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सिनेमात अक्षय कुमार, कृती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. फरहाद सामजी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर साजिद नाडियादवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
18 मार्चला 'बच्चन पांडे' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार असल्याने अक्षय कुमारचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने सोशल मीडियावर बच्चन पांडेचे पोस्टर शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या