Yash Confirm Ravan Role In Ranbir Kapoor Ramayan : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित रामायण चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याची जोरदार चर्चा आहे. रामायण चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार असून सितामातेच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाबाबत प्रत्येक नव्या अपडेटकडे चाहते डोळे लावून आहेत. या चित्रपटाबाबत आता नवीन अपडेट समोर आली आहे.  या चित्रपटात राम आणि सीतेच्या भूमिकेतील स्टार्सची निवड झाल्यानंतर रावणाच्या भूमिकेची चर्चा सुरु होती. आता रावणाच्या भूमिकेसाठी सुपरस्टार अभिनेत्याची निवड झाली आहे.


रणवीर कपूरच्या रामायणमध्ये KGF स्टारची एन्ट्री


रामायण चित्रपटात रावणाच्या भूमिकेत नेमका कोणता अभिनेता दिसणार याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावे चर्चेत होती. केजीएफ स्टार यश या भूमिकेत दिसेल, असंही बोललं जात होतं. मात्र, आता या भूमिकेत नेमका कोणता अभिनेता दिसणार, त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. रामायण चित्रपटात रावणाच्या भूमिकेत केजीएफ फेम अभिनेता यश दिसणार आहे. या बातमीवर त्याने स्वत: शिक्कामोर्तब केला आहे. एका मुलाखतीत यशने यासंदर्भात माहिती दिली आहे.


यश साकारणार रावणाची भूमिका


सुपरस्टार यशने अलिकडेच एका मुलाखतीत त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत माहिती देत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. एका मुलाखतीत अभिनेता यशने या चर्चांना पूर्णविराम देत रामायण चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. डीएनईडी आणि प्राईम फोकसच्या नमित मल्होत्राच्या मुलाखतीत यश रामायण चित्रपटात रावणाची व्यक्तिरेखा साकारणार असल्याचं त्याने सांगितलं. यावेळी यश म्हणाला की, ही भूमिका अतिशय दमदार आणि ही भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. यासाठी खूप उत्साही असल्याचंही त्याने सांगितलं आहे.