Siddharth Jadhav Birthday Special : फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठा कलाकारा आणि स्टारडम मिळवण्याची स्वप्न घेऊन दररोज हजारो लोक येत असतात. पण, त्यातील फारच कमी लोक मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवतात. आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल बोलणार आहोत. ज्यानं मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर चाहत्यांचं प्रेम आणि प्रसिद्धी मिळवली आहे. या अभिनेत्याने मराठी चित्रपटांमधून करियरला सुरुवात केली. यानंतर  त्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्याने उत्तम कॉमेडी करत प्रेक्षकांना हसवलं. बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्याने धमाल केली. यानंतर त्याला रोहित शेट्टीकडून मोठा ब्रेक मिळाला. हा मराठमोळा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. 


अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा आज 43 वा वाढदिवस आहे. कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सिद्धार्थ जाधव याने चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय दाखवत प्रेक्षकांचं मनही जिंकलं आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या.


'या' मराठमोळ्या स्टारला ओळखलंत का?


सिद्धार्थ जाधवचा जन्म 23 ऑक्टोबर 1981 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तो त्याच्या आई-वडिलांचा चौथा मुलगा आहे. सिद्धार्थच्या वडिलांचं नाव रामचंद्र आणि आईचं नाव मंदाकिनी जाधव आहे. सिद्धार्थ जाधवचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत, शिवडी महापालिका मराठी शाळा (प्राथमिक), सरस्वती हायस्कूल, नायगाव दादर (माध्यमिक) इथे झालं. रुपारेल कॉलेजमधून त्याने ग्रॅज्युएशन केलं. सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली. मराठी चित्रपटात अनेक वेगवेगळ्या सिद्धार्थने भूमिका साकरल्या आहेत. यासाठी त्यला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.


मराठी चित्रपटसृष्टीपासून करियरला सुरुवात


अभिनेता आणि कॉमेडियन सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपटसृष्टीपासून करियरला सुरुवात केली. अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध प्रकारची भूमिका साकारत त्याने आपली वेगळी छाप सोडली. मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय कौशल्य सिद्ध केल्यानंतर सिद्धार्थ जाधव टीव्हीकडे वळला आणि पहिल्याच शोपासून तो छोट्या पडद्यावर प्रसिद्ध झाला. 2006 मध्ये आलेल्या 'बा बहू और बेबी'  टीव्ही शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. यानंतर तो 'साराभाई वर्सेस साराभाई' मध्येही प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी ठरला.


'या' दिग्दर्शकामुळे आयुष्याला कलाटणी मिळाली


टीव्हीवर कॉमेडी शोमुळे नाव कमावल्यानंतर 2006 मध्ये सिद्धार्थ जाधवला एका व्यक्तीची भेट झाली ज्याने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. ही व्यक्ती म्हणजे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक रोहित शेट्टी. दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'गोलमाल' या कॉमेडी चित्रपटात सिद्धार्थ जाधवला ब्रेक दिला, जो सिद्धार्थ ब्रेकथ्रू ठरला. 'गोलमाल' चित्रपटामधील सिद्धार्थ जाधवची व्यक्तिरेखा लोकांना आवडली. यानंतर 2018 मध्ये रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये त्याची एन्ट्री झाली. 'सिम्बा' चित्रपटात सिद्धार्थ पोलिसाच्या भूमिकेत झळकला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


अभिनेत्री एका गाण्यामुळे रातोरात बनली स्टार, लग्नाच्या 19 वर्षानंतर घटस्फोट, 12 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमातही मिळाला धोका