Ketaki Chitale Trolled : आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवताना दिसत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. त्यामुळे महापालिका कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हे करत असताना दिसत आहेत. कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेले आले असता अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने कर्मचाऱ्यांशी बोलताना आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. शिवाय तिने कर्मचाऱ्यांशी हुज्जत देखील घातली. त्यामुळे चितळेला नेटकऱ्यांकडून तुफान ट्रोल करण्यात येत आहे. 


केतकी चितळे नेटकऱ्यांकडून ट्रोल 


महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्यानंतर केतकी चितळेला नेटकरी तुफान ट्रोल करत आहेत. केतकीला ट्रोल करत असतानाच नेटकरी महापालिकाकडून आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे कौतुक करताना दिसत आहे. महिला कर्मचाऱ्याने अतिशय शांत पद्धतीने उत्तरे दिली, असे मत एका नेटकऱ्यांने व्यक्त केले आहेत. तर एका नेटकऱ्याने लिहिले की, "जेलची हवा खाऊन आली तरीही सुधरलेली नाही."


काय म्हणाली होती केतकी चितळे?


केतकी चितळेने महापालिका कर्मचाऱ्याबाबत बोलतानाचा व्हिडीओ शेअरही केला आहे. यामध्ये महापालिका कर्मचारी सर्वेक्षणासाठी आल्यानंतर केतकी म्हणते, "तुम्ही महापालिकेकडून आला आहात ना? तुम्ही सर्वांना जात विचारत आहात आरक्षित की ओपन?" यावर कर्मचाऱ्यांकडून हो असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर केतकी त्यांना का? असा प्रश्न विचारते. तेव्हा कर्मचारी आरक्षणासाठी असे उत्तर देते. त्यानंतर केतकी म्हणते मराठा आरक्षणासाठी का? नेमकं कशासाठी हे? तुमची जात कोणती? असे सवाल केतकी कर्मचाऱ्यांना करत आहे. 


'तुम्ही मराठा आहात म्हणजे माझ्यावरती अॅट्रॉसिटी टाकणार नाहीत?'


केतकी चितळेची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. या व्हिडीओमध्ये केतकी म्हणते, "तुम्ही मराठा म्हणजे माझ्यावर अॅट्रॉसिटी टाकणार नाहीत. मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे. धन्यवाद मॅडम. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि लोक आरक्षणासाठी लोक प्रश्न विचारत आहेत. महानगर पालिकेकडून लोक येत आहेत. याबाबत प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान नाही. प्रजासत्ताकदिना दिवशीच हा सर्वे सुरु आहे. संविधान जातीजातींमध्ये भेदभाव निर्माण करत आहे. जातींवर आधारित कायदे बनवले जात आहेत. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय"






इतर महत्वाच्या बातम्या 


Telly Masala :  सर्व्हेत जात विचारल्याने पुष्कर जोग भडकला ते आज पार पडणार 'बिग बॉस 17' चा ग्रँड फिनाले; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या