Sunny Leone: केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी (16 नोव्हेंबर) अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone), तिचा पती डॅनियल वेबर आणि त्यांच्या कर्मचाऱ्याविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या खटल्यातील फौजदारी कारवाईला स्थगिती दिली. न्यायमूर्ती झियाद रहमान एए यांनी सनी लिओनीच्या याचिकेवर हा आदेश दिला. सनीच्या याचिकेच्या सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत न्यायालयाने फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे. 


काय आहे प्रकरण? 
केरळमधील एका इव्हेंट मॅनेजरनं सनी लिओनी, तिचा पती आणि त्यांचे कर्मचारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. सनी लिओनीला कार्यक्रमांमध्ये हजर राहण्यासाठी आणि परफॉर्म करण्यासाठी लाखो रुपये दिले पण तरीही अभिनेत्री या कार्यक्रमाला आली नाही, असा आरोप तक्रारकर्त्याने केला होता. त्यानंतर सनी लिओनी, तिचा पती आणि त्यांचे कर्मचारी यांच्याविरुद्ध कलम  406, 420 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सनी लिओनी, तिचा पती आणि त्यांचे कर्मचारी या तिघांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली. 


सनी लिओनीनं याचिकेत निर्दोष असल्याचा केला दावा  


सनी, तिचा पती आणि कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपण निर्दोष आहोत आणि कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी नसल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली. आपल्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसतानाही या खटल्याच्या प्रक्रियेदरम्यान तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे, असेही अभिनेत्रीने म्हटले आहे. 


सनीच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. इन्स्टाग्रामवर तिला जवळपास  49.5 मिलियन लोक फॉलो करतात. सनीचा ‘करणजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक हे सनीच्या जीवनावर आधारित आहे. 




वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 16 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!