Krishna Ghattamnaneni: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूचे (Mahesh Babu) वडील कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamnaneni) यांचे मंगळवारी (15 नोव्हेंबर) निधन झाले. कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते होते. कृष्णा घट्टामनेनी यांनी हैदराबादमधील कॉन्टिनेन्टल रुग्णालयात वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नुकतीच कृष्णा घट्टामनेनी यांची मुलगी मंजुलानं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. 'तुम्ही माझे हिरो आहात.' असं मंजुलानं पोस्टमध्ये लिहिलं.
मंजुलानं कृष्णा घट्टामनेनी यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'तुम्ही जगासाठी एक सुपरस्टार आहात पण आमच्यासाठी, घरी आमचे एक प्रेमळ, साधे वडील आहात जे काहीही झाले तरीही आमच्या पाठिशी नेहमी उभे असतात. तुमच्या व्यस्त टाइम टेबलमधून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढत होता. तुम्ही आम्हाला आवश्यक ते सर्व दिले.'
'आयुष्य कसं जगावं यावर तुम्ही आम्हाला कधीच लेक्चर दिलं नाहीत. तुम्ही आम्हाला ते तुमच्या कृतीतून शिकवले. तुमचा साधेपणा, सौम्यता, शिस्त, वक्तशीरपणा हे अतुलनीय आहे. तुमचा वारसा आणि चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदान चिरंतन राहो.' असंही तिनं पोस्टमध्ये लिहिलं.
मंजुलाची पोस्ट
कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक असण्यासोबत ते राजकारणीदेखील होते. गेल्या पाच दशकांत त्यांनी 350 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Ghattamaneni Krishna Passed Away : सुपरस्टार महेश बाबूला पितृशोक, वडील कृष्णा घट्टामनेनी यांचं निधन