Aastad Kale On Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण (Shraddha Murder Case) सध्या देशभरात चर्चेत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताबनं गळा दाबून तिची हत्या केली आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे त्याने 35 तुकडे केले. ते तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले आणि टप्प्याटप्प्याने तो त्याची विल्हेवाट लावत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. या घटनेप्रकरणी आता अभिनेता आस्ताद काळेने (Aastad Kale) अप्रत्यक्षरित्या संताप व्यक्त केला आहे. 


आस्ताद काळे सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असून तो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. विविध सामाजिक मुद्द्यांवर तो त्याचं मत मांडत असतो. आता त्याने फेसबुक पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षरित्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.


आस्तादने लिहिलं आहे,"तिचं त्याच्याशी भांडण झालं, त्यात तिचा मृत्यू झाला...", अशी बातमी वाचली. जोडीदाराबरोबरच्या भांडणात चुकून मृत्यू झाला हेच पटत नाही... पुढे जे घडलं ते शत्रूच्या बाबतीतही घडू नये." आस्तादच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 'त्या माणसाली शिक्षा व्हायला हवी', 'अशा अनेक श्रद्धा निर्णाण होतच राहणार', 'एक पिढी डोळ्यासमोर उद्धवस्त होत आहे, त्यांना वाचवायला हवं', अशा कमेंट्स करत नेटकरी आपला संताप व्यक्त करत आहे. 



स्वरा भास्करनेदेखील एक ट्वीट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. तिने लिहिलं आहे,"हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे. यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्या मुलीबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. त्या मुलीच्या प्रिय आणि विश्वासू व्यक्तीने तिचा विश्वासघात केला. आशा आहे की, पोलीस त्यांचा तपास त्वरीत पूर्ण करतील. त्या राक्षसाला योग्य ती कठोर शिक्षा मिळेल, अशी आशा व्यक्त करते". 






नेमकं प्रकरण काय?


श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत. सध्या पोलीस हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेत आहेत. आफताब पूनावालानं पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं की, "हत्येपूर्वी काही दिवस श्रद्धानं आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. वैतागल्यामुळे रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली.'


संबंधित बातम्या


Swara Bhasker: 'त्या राक्षसाला...' श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया