Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati 15) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आहे. नुकतेच या कार्यक्रमात 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमातील सुहाना खान (Suhana Khan), अगस्त्य नंदा, आदिती, वेदांग रैना, खुशी कपूर आणि जोया अख्तर हे कलाकार सहभागी झाले होते. त्यावेळी या कार्यक्रमाचे होस्ट बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सुहानाला (Suhana Khan) शाहरुखबद्दल एक प्रश्न विचारला. पण या प्रश्नाचं उत्तर सुहानाला मात्र देता आलं नाही. त्यानंतर बिग बींनी तिची शाळा घेतली. तसेच नेटकऱ्यांनीही किंग खानच्या लेकीला ट्रोल केलं आहे.


सुहानाला विचारलेला प्रश्न काय आहे? 


'कौन बनेगा करोडपती 15' या कार्यक्रमातील एका फेरीत सुहानाला शाहरुखबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शाहरुखला आतापर्यंत कोणता पुरस्कार मिळालेला नाही? 
पर्यात होते - A) पद्मश्री
B) लीजन ऑफ ऑनर
C) एल 'एलोइल डी)
D) वोल्पी कप






बिग बींनी घेतली सुहानाची शाळा


बिग बींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे 'वोल्पी कप' असं आहे. तर सुहानाने 'पद्मश्री' असं चुकीचं उत्तर दिलं आहे. सुहानाला उत्तर न देता आल्याने बिग बींनी तिची शाळा घेतली आहे. बिग बी म्हणाले,"वडिलांना कोणता पुरस्कार मिळाला हे सुहानालाच माहिती नाही. सुहानाला येईल असा प्रश्न मी तिला विचारला होता. पण त्याही प्रश्नाचं उत्तर तिला देता आलं नाही". सुहानाने आधीच बिग बींना सोपे प्रश्न विचारण्यास सांगितलं होतं. त्यानुसार बिग बिंनी सुहानाला ज्या प्रश्नाचं उत्तर देता येईल असा प्रश्न विचारला. पण त्याही प्रश्नाचं उत्तर तिला देता आलेलं नाही.


'द आर्चीज' प्रेक्षकांच्या भेटीला


'द आर्चीज' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्टारकिडच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता होती. आता 'द आर्चीज' रिलीज झाल्याने या सिनेमाला प्रेक्षकांना संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या सिनेमात सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा, वेदांग रैना, युवराज मेंदा, अदिती सहगल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून अगस्त्य नंदाने आणि खुशी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येऊ शकतो. 7 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.


संबंधित बातम्या


Kaun Banega Crorepati 15: "मला सोपे प्रश्न विचारा कारण..."; केबीसीच्या मंचावर शाहरुखच्या लेकीनं बिग बींना केली रिक्वेस्ट