Kaun Banega Crorepati 15: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती 15 (Kaun Banega Crorepati 15) या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये द आर्चीज (The Archies) या चित्रपटामधील कलाकार हॉटसीटवर दिसणार आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तसेच शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात एन्ट्री करत आहे. केबीसीच्या एपिसोडमध्ये द आर्चीज या चित्रपटातील कलाकार हे बिग बी यांच्यासोबत मजेदार विषयांवर गप्पा मारताना दिसणार आहेत.
सुहाना खाननं बिग बींना केली रिक्वेस्ट
अमिताभ बच्चन यांनी सुहानाला विचारले की, "तू केबीसी 15 मध्ये येणार हे तुझ्या कुटुंबाला कळाल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती?" यावर सुहानाने बिग बींना सांगितले की, "प्लिज, मला सोपे प्रश्न विचारा कारण मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की, तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये माझ्या वडिलांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे कृपया मला सोपे प्रश्न विचारा"
अमिताभ बच्चन यांनी सांगितला अगस्त्यच्या बालपणीचा मजेशीर किस्सा
अमिताभ बच्चन यांनी त्यांचा नातू अगस्त्यच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'एकदा अगस्त्यचे आई-वडिल त्याला माझ्यासोबत सोडून परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी मी अगस्त्यला घेऊन मुंबईमध्ये फिरायला जात होतो. कारमध्ये बसल्यावर अगस्तय मला म्हणाला, 'मला दिल्लीला जायचे आहे.' त्यानंतर मी त्याच्या आई-वडिलांना फोन केला आणि म्हणालो, तुम्ही लवकर परत या, तुमच्या मुलाला दिल्लीला जायचे आहे."
कधी रिलीज होणार द आर्चीज? (The Archies Release Date)
'द आर्चीज' या चित्रपटामधून अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. यामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच 'द आर्चीज' या चित्रपटात मिहिर आहुजा, आदिती सहगल, युवराज मेंडा आणि वेदांग रैना हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 'द आर्चीज' या चित्रपटात आर्ची, बेट्टी, वेरोनिका, जुगहेड, रेगी, एथेल आणि डिल्टन या भूमिकांची कथा दाखवण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: