Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा काल (9 डिसेंबर) विवाह सोहळा पार पडला. राजस्थानमधील सवाई माधोपुर (Sawai Madhopur) मधील बरवाडा फोर्टमध्ये कतरिना आणि विकीचा विवाहसोहळा पार पडला.  लग्नानंतर कतरीनाच्या एंगेजमेंट रिंगची चर्चा सुरु झाली आहे. विकी कौशलने कतरिना कैफला डायमंड-सेफायर अंगठी घातली होती. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये कतरिनाच्या एंगेजमेंट रिंगमध्ये हिरे दिसत आहेत. कतरिनाच्या लग्नाची अंगठी 'Tiffany & Co' आहे, जी आयताकृती आहे. रिपोर्ट्सनुसार, विकीने कतरिनाला दिलेली आंगठीची किंमत  9800 USD म्हणजेच सुमारे 7,40,735 रुपये इतकी आहे. अंगठीसह कतरिनाचे मंगळसूत्रही खूप सुंदर आहे, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.


कतरिना कैफने लग्नात गडद गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. तर विकी कौशलने लग्नात फिकट गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती. कतरिनाने केसात गजरा माळला होता. कतरिना आणि विकी 12 डिसेंबरपर्यंत सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये राहणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला. विकी कौशलने नुकतेच लग्नसोहळ्यातले फोटो शेअर केले आहेत. मात्र, यातल्या एका फोटोने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं. ज्यात कतरिनाच्या हातात अंगठी अर्थातच एंगेजमेंट रिंग दिसली. 






लग्नात 'या' अटींचा होता समावेश -
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या. लग्नाला येण्यासाठी पाहुण्यांना खास निमंत्रण कोड देण्यात आला होता. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली होती. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नव्हता.