Katrina Kaif Changed Instagram Profile Pic : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नाच्या एका आठवड्यानंतर कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवरील प्रोफाईल फोटो बदलला आहे. तिने आता तिचा प्रोफाईल फोटो म्हणून विकीसोबतचा एक रोमॅंटिक फोटो ठेवला आहे. 


कतरिना कैफने बदलला प्रोफाइल फोटो 
कतरिनाचा नवीन प्रोफाईल फोटो विकी कौशलसोबतचा आहे. हा फोटो त्यांच्या लग्नाच्या दिवशी काढण्यात आला आहे. या फोटोत दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघताना दिसत आहेत. कतरिनाने हा फोटो लग्नानंतर सोशल मीडियावरदेखील शेअर केला होता.





कतरिना आणि विकी कौशलचे लग्न 9 डिसेंबरला सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये पार पडले. या शाही लग्नसोहळ्यात फक्त त्यांच्या जवळच्या लोकांनी हजेरी लावली होती. लग्नाच्या काही तासांनंतर या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. या फोटोंवर कॅप्शन लिहिली होती,"तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्ही या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहोत".



कतरिना आणि विकीच्या लग्नानंतर 20 डिसेंबरला मुंबईत भव्य रिसेप्शन होणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. रिसेप्शनची तयारीदेखील सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता, रिसेप्शनमध्ये सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


संबंधित बातम्या


Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश


Kareena Kapoor : क्वारंटाईन करिना कपूर झाली भावूक, पती आणि मुलासाठी इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत म्हणाली...


Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर Tom Holland भावूक; व्हिडीओ व्हायरल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha