kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. करीनाला कोरनाची लागण झाल्याचे कळताच तिने स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले होते. तसेच खबरदारी घेत ती कोरोना नियमांचे पालन करत आहे. क्वारंटाईन असल्यामुळे करीनाला सध्या तिच्या मुलाची आणि नवऱ्याची म्हणजेच सैफ अली खानची आठवण येत आहे. 


करीना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आयुष्यात घडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच करीनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्या स्टोरीमुळे तिला तिच्या कुटुंबियांची आठवण येत आहे, याचा अंदाज येत आहे. कोरोना काळातदेखील तिचे पती आणि मुलावरील प्रेम कमी झालेले नाही. 


अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी कोरोना नियमांचं पालन न करता अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कातील सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले आहेत.


 


करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत त्या सर्वांना आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केली आहे. या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्या सूपर स्प्रेडर ठरू शकण्याची शक्याता सूत्रांनी व्यक्त केली आहे. आज आणखी काही बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचे कोरोना रिपोर्ट येणार आहेत. करीना आणि अमृता यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची बीएमसीने कोरोना चाचणी केली आहे. 


संबंधित बातम्या


Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश


बॉलिवूडकर सूपर स्प्रेडर, अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरलादेखील कोरोनाची लागण


आता दबंग स्टारच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्यालाही कोरोनाची लागण


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha