Kartik Aryan : बॉलिवूड कलाकारांचे असंख्य चाहते आहेत. हे चाहते त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तासनतास वाट पाहतात, त्यांच्या घरासमोर उभे राहतात. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे (Kartik Aryan) अनेक चाहते आहेत जे त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी तासनतास वाट पाहत असतात. मात्र, अशा प्रकारची क्रेझ खुद्द कार्तिनेही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी दाखवली आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल.


अभिनेता कार्तिक आर्यनने त्यांच्या स्ट्रगलच्या दिवसांनी आठवण सांगितली आहे. आज कार्तिक त्याच्या कारकिर्दीच्या उंचीवर आहे, पण एक काळ असा होता जेव्हा तो पहिल्यांदाच मुंबई शहरात आला आणि आपल्या करिअरसाठी धडपडत होता. ते दिवस आठवत कार्तिकने नुकताच त्याच्या आवडत्या व्यक्तीबद्दल सांगताना एक किस्सा सांगितला आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून 'किंगखान' शाहरुख खान (Shahrukh Khan) आहे.


कार्तिकने सांगितले की, ''शाहरुख खान हा पहिला सेलिब्रिटी आहे ज्याच्यासोबत त्याने सेल्फी घेतला. जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो, तेव्हा 'मन्नत'च्या बाहेर एका चाहत्याप्रमाणे शाहरुख खानच्या घरी गेलो होतो. तो रविवारचा दिवस होता आणि मी ऐकले होते की दर रविवारी सर चाहत्यांना भेटतात. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा तो त्याच्या गाडीतून जात होते आणि त्या गर्दीत मला त्याच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली.''


कार्तिक आर्यन आणि शाहरुख खान यांनी कधीही एकत्र काम केलेले नाही. मात्र, गेल्या वर्षी तो शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित चित्रपटात काम करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र काही कारणास्तव हे होऊ शकले नाही. सध्या कार्तिककडे अनीस बज्मीचा 'भूल भुलैया 2', रोहित धवनचा 'शेहजादा', तेलुगु हिट 'आला वैकुंठापुरमलो' यासह अनेक चित्रपट आहेत. 


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha