Prakash Raj, Uddhav Thackeray : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. महाराष्ट्रातील राजकारण सध्या ढवळून निघालं आहे. यातच आता राज्यातील मंत्रीमंडळ देखील बरखास्त झालं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. बहुमत सिद्ध करण्याच्या आदल्याच दिवशी संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त झाले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पाठींबा दिला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी देखील ट्विटरवर एक पोस्ट लिहित उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.


बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे नेहमी आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत एक पोस्ट लिहिली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे.


काय आहे पोस्ट?


‘तुम्ही खूप छान काम केलेत सर! @OfficeofUT … आणि मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळले, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील..चाणक्य आज लाडू खात असतील..पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील.. तुम्हाला आणखी बळ मिळो!’, असे त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे.


पाहा पोस्ट :



मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देत उद्धव ठाकरे म्हणतात...


‘शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार, शिवसैनिकांची सेवा करणार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधला होता.


सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आदेश कायम ठेवत महाविकास आघाडी सरकारला 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरुन संवाद साधला आणि मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं जाहीर केलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Political Crisis Timeline : एकनाथ शिंदेंचं बंड ते उद्धव ठाकरेंचा राजीनामा; सत्तासंघर्षाच्या दहा दिवसांत काय-काय घडलं?


Maharashtra Political Crisis : विरोधकांकडे आता बोलायला उरलंय काय? सामना अग्रलेखातून भाजपला थेट सवाल