Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या त्याच्या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. कार्तिक हा सोशल मीडियाच्या माध्यमामधून त्याच्या चाहत्यांसोबत चर्चा करत असतो. ट्विटरवर कार्तिकनं #AskKartik नावाचे सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमध्ये अनेकांनी कार्तिकला काही प्रश्न विचारले प्रश्न तर काहींनी कार्तिकच्या अभिनयाचं कौतुक केलं. एका नेटकऱ्यानं मात्र कार्तिकला एक मजेशीर कमेंट केली. त्यानं '500 रुपये दे कौतुक करतो' असं ट्वीट केलं. नेटकऱ्यांच्या या कमेंटला कार्तिकनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधलं.
कार्तिकच्या चाहत्यानं कार्तिकला ट्रग करुन '500 दे कौतुक करतो' अशी कमेंट केली. त्यानंतर कार्तिकनं ' पेटीएम करु की गूगल पे' असा मजेशीर रिप्लाय दिला. त्यानंतर पुन्हा त्या नेटकऱ्यानं ट्वीट केलं, 'सर अजून पेमेंट झालेलं नाही' यावर कार्तिक म्हणाला, 'तू कौतुक केलंच नाही. ' यावर तो नेटकरी म्हाणाला, 'तारीफ करूं क्या उसकी जिसने आपको बनाया।' कार्तिक आणि या नेटकऱ्याचे ट्विट्स हे सध्या चर्चेत आहेत.
आस्क मी एनीथिंग या सेशनमध्ये कार्तिकला एका नेटकऱ्यानं कार्तिकला प्रश्न विचारला, '150 कोटींमधले तुला किती प्रॉफिट मिळाले? ' या प्रश्नाला कार्तिकनं उत्तर दिलं, '150 कोटींमध्ये प्रॉफिट नाही तर चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे.' पुढे कार्तिकच्या एका चाहत्यानं त्याला प्रश्न विचारला की, 'भूल भुलैय्या-2 नं 100 कोटी क्रॉस केल्यानंतर पहिल्यांदा काय केलं?' यावर कार्तिक म्हणाला, 'सर्वांत पहिल्यांदा मी मंदिरात गेलो होते.'
कार्तिकचे आगामी चित्रपट
'सोनू के टीटू की स्वीटी', 'प्यार का पंचनामा 2', 'भूल भुलैया 2', 'पति पत्नी और वो' आणि 'धमाका' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याचे काही आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'सत्यनारायण की कथा' आणि 'कॅप्टन इंडिया' हे कार्तिकचे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती.