मुंबई : राकेश रोशन दिग्दर्शित 'कहो ना प्यार है' हा हृतिक रोशनचा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमातून हृतिकने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटाने त्याला रातोरात सुपरस्टार बनवलं. चित्रपटात अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होती.

 

 

पण फारच कमी लोकांना माहित असेल की, या सिनेमात करीना कपूरही होती. 'कहो ना प्यार है'मध्ये करीनाने छोटीशी भूमिका साकारली होती. चित्रपटात एक सीन आहे ज्यात दगडांच्या मागे हृतिकसह एक मुलगी आहे. ती मुलगी अमिषा नसून करीना आहे. स्वत: करीना कपूरने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

 



खरंतर राकेश रोशन या सिनेमातून करीनाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होते. करीनाने 'कहो ना प्यार है'साठी काही सीन चित्रीतही केले. पण तिने जे पी दत्ता यांच्या रेफ्युजीमधून डेब्यू करण्याचा निर्णय घेतला. अखेर हा रोल अमिषा पटेलला मिळाला.

 

 

महत्त्वाचं म्हणजे दोन्ही चित्रपट एकाच वर्ष प्रदर्शित झाले. पण जे यश 'कहो ना प्यार है'ला ते 'रेफ्युजी'ला मिळालं नाही.

 



मात्र 'कहो ना प्यार है' हा करीनाचा पहिला सिनेमा होता, ज्यासाठी तिने चित्रीकरण केलं होतं. चित्रपटातील तो सीन आठवतोय का, ज्यात अमिषा पटेल दुसऱ्या हृतिकला घेऊन बीचजवळच्या घरात जात असते. मात्र तिथे पोलिसांना पाहून दगडांच्या मागे लपतात? त्या सीनमध्ये ब्लू स्वेटर आणि जीनमध्ये असलेली अमिषा पटेल नसून करीना कपूर आहे.