Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम आहे. 105 दिवस चालणाऱ्या या खेळात 17 स्पर्धक सहभागी झाले आहेत. 'बिग बॉस 17' सुरू होऊन 24 तासही पूर्ण न होता या घरात लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) आणि मनारा चोप्रा (Mannara Chopra) या दोन स्पर्धकांमध्ये प्रेमाचं नातं फुलायला सुरुवात झाली आहे.
'बिग बॉस 17'च्या घरात एन्ट्री घेतल्यापासून मुनव्वर फारुकी आणि मनारा एकमेकांना आपण किती चांगले आहोत हे पटवून देताना दिसत आहेत. 'बिग बॉस'ने कन्फेसन रुममध्ये बोलावल्यावरही ते एकमेकांचं नाव घेतल्यानंतर लाजताना दिसून आले.
मनारा-मुनव्वरच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
मनारा आणि मुनव्वरच्या क्रेमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहते त्यांनी 'ब्यूटी अॅन्ड ब्रेन कपल' म्हणत आहेत. मुनव्वर हा बिग बॉसच्या घरातील तगडा स्पर्धक आहे. 'बिग बॉस 17'च्या अंतिम टप्प्यापर्यंत तो खेळात असेल असा चाहत्यांचा अंदाज आहे. तर दुसरीकडे मुनव्वरने प्रेमात न पडता खेळावर लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला चाहते देत आहेत.
मुनव्वर आणि मनाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मनारा आणि मुनव्वरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर मुनव्वर आणि मनाराची जोडी खूप छान आहे, चांगलच मनोरंजन करतील, 'बिग बॉस 17'मधील 17 स्पर्धकांपैकी आमचा पाठिंबा मुनव्वरला आहे, दोघांना एकत्र पाहणं मजेशीर असणार आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
मुनव्वर-मनाराबद्दल जाणून घ्या...
खेळ कसा खेळायचा हे मुनव्वरला ठाऊक आहे. कंगना रनौतच्या लॉकअप या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. त्यावेळी अंजली अरोडा आणि मुनव्वरची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती. आता त्याचं नाव मनारासोबत जोडलं जात आहे. मुनव्वर आणि मनाराचं नातं बहरणार की हा बिग बॉसचा प्लॅन आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मनारा ही अभिनेत्री प्रियंका चोप्राची बहीण आहे. अनेक सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. तर दुसरीकडे मुनव्वर हा विनोदवीर म्हणून लोकप्रिय आहे.
संबंधित बातम्या