Karan Johar : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच करण जोहरने एका कार्यक्रमात ‘आपल्याला करीना कपूरला डेट करायचे होते’ असे म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे करण चांगलाच चर्चेत आला आहे. करण जोहर आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor-Khan) यांची चांगली मैत्री आहे. दोघांनी अनेकदा एकत्र काम केले आहे. यासोबतच दोघेही एकत्र पार्ट्यांमध्ये दिसतात. पण, एकदा करण जोहरने सर्वांसमोर जाहीर केले होते की, त्याला करीना आवडते. त्याला करीनासारखी पत्नी हवी असल्याचेही त्याने म्हटले.


करण जोहर नुकताच अनिता श्रॉफ अदजानियाच्या चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान त्याने याचा खुलासा केला होता. अनिताने करणला विचारले की, तुला कोणाशी लग्न करायचे आहे का? यावर करणने करीनाचे नाव घेतले. तो म्हणाला की, माझ्या जीवनसाथीमध्ये असावेत असे सर्व गुण करीनामध्ये आहेत.


डेट करण्याची संधी मिळाली तर...


करण जोहर म्हणाला की, जर त्याला कधी कोणाला डेट करण्याची संधी मिळाली तर, ती व्यक्ती करीना कपूर असेल. करीना आणि करणने ‘कभी खुशी कभी गम’, ‘वी आर फॅमिली’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘गुड न्यूज’ यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. करण जोहर नेहमीच त्याच्या शोमुळे चर्चेत असतो. करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो खूप लोकप्रिय झाला आहे. या शोमुळे करण जोहर दररोज सोशल मीडियावर चर्चेत असतो. मात्र, आता करण त्याच्या या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.


बॉलिवूडवरही भाष्य!


करणला प्रश्न विचारण्यात आला की, 'बॉलिवूड संपुष्टात आलंय का? या प्रश्नाला करणनं उत्तर दिलं, 'हे सगळं बकवास आहे. चांगला चित्रपट चांगली कमाई करतो. गंगूबाई काठियावाडी आणि भूल भूलैय्या-2 या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जुगजुग जियो चित्रपटानं देखील चांगली कमाई केली. चित्रपट जर चांगला नसेल तर तो चांगली कमाई करणारच नाही.'


करण पुढे म्हणाला, 'मला आशा आहे की, बॉलिवूडचे आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतील. मला माहित आहे प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणणे अवघड आहे. पण बॉलिवूड संपुष्टात येईल असं मला वाटत नाही. लाला सिंह चड्ढा, रक्षाबंधन, ब्रह्मास्त्र हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. वर्षाच्या शेवटी सलमानचा देखील चित्रपट येतोय.'


करणचे आगामी प्रोजेक्ट


करणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकताच त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचवेळी त्याचा दिग्दर्शक म्हणून ‘रॉकी और राणीकी प्रेमकथा’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच करणने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.


हेही वाचा: