Karan Johar Net Worth : बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करण जोहरने शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. करण सोशल मीडियावरदेखील चर्चेत असतो. धर्मा प्रॉडक्शनचा मालक असलेला करण जोहर त्याचे आयुष्य खूपच आलिशान पद्धतीने जगतो. तसेच तो करोडोंचा मालकदेखील आहे. 


बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट सिनेमाचा दिग्दर्शक असलेल्या करण जोहरकडे सुमारे 1400 कोटी रुपयांची संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, करण जोहर एक सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये घेतो. गेल्या काही वर्षांत करण जोहरच्या संपत्तीत जवळपास 80% वाढ झाली आहे. करण जोहर बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या घेणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. 


करण जोहरने 2010 साली 32 कोटींचे घर विकत घेतले होते. तसेच मुंबईतील मलबार हिल्समध्ये करण जोहरचे आणखी एक घर आहे. याची किंमत सुमारे 20 कोटी आहे. सिनेनिर्माता करण जोहरकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत आठ कोटी रुपयांपर्यंत आहे. करणकडे मर्सडीज आणि एस 560, बीएमडब्ल्यू यासारख्या लग्झरी गाड्या आहेत. करणला शूजचे कलेक्शन करायला देखील आवडते. त्याच्याकडे Louis, Vuitton, Stella, Mccartney, Donatella, Versace या कंपन्यांच्या शूजचे कलेक्शन आहे.


करण जोहरचा जुग जुग जियो हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी आणि वरुण धवन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 


संबंधित बातम्या


Karan Johar's 50th Birthday : करण जोहरचा 50 वा वाढदिवस; DDLJ नं करिअरला सुरूवात, आज कोट्यवधींचा मालक


Karan Johar : करण जोहरने वाढदिवशी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; रोमॅंटिक सिनेमानंतर आता करणार अॅक्शनपट