KGF 3 : 'केजीएफ' (KGF) सिनेमाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 2018 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 14 एप्रिल 2022 ला या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 2025 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'केजीएफ 3' च्या शूटिंगला कधी होणार सुरुवात?
'केजीएफ 2' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना ट्विटरवर #केजीएफ3 ट्रेंड करत होते. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'केजीएफ'च्या तिसऱ्या भागाच्या शूटिंगला ऑक्टोबर 2022 मध्ये सुरुवात होणार आहे. अद्याप निर्मात्यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
'केजीएफ 3' कधी होणार रिलीज?
'केजीएफ' सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील सध्या 'सालार' सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या ते व्यस्त आहेत. 30 ते 35 टक्के या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर प्रशांत नील 'केजीएफ'च्या तिसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. हा सिनेमा 2025 साली रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची चांगलीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
'केजीएफ'च्या पहिल्या भागात रामचंद्र राजू विरोधी भूमिकेत दिसून आले होतो. त्यांनी गरुणा हे पात्र साकारले होते. तर दुसऱ्या भागात संजय दत्त अधीराच्या भूमिकेत दिसून आला होता. त्यामुळे केजीएफच्या तिसऱ्या भागातदेखील काही खास कलाकार दिसून येणार आहेत. तिसऱ्या भागात ऋतिक रोशन आणि राणा दग्गुबाती दिसून येणार आहे. तसेच कमल हासनचे नावदेखील चर्चेत आहे.
यशनेही दिले संकेत!
'केजीएफ 3' येणार की नाही? या प्रश्नावर उत्तर देताना चित्रपटाचा मुख्य अभिनेता यश याने म्हटले की, चित्रपटाच्या तिसर्या भागाबाबत त्याची आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यात आधीच चर्चा झाली आहे. प्रशांत नील यांना याच्या सीक्वेन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर त्यांनी सांगितले की, ‘याबद्दल काही बोलणे घाईचे ठरेल. पण जर लोकांना KGF: Chapter 2 आवडत असेल, तर आम्ही फ्रेंचायझी सुरू ठेवण्याचा विचार करू शकतो.’
संबंधित बातम्या