Zollywood : झाडीपट्टी नाटकाची धमाल दाखवणाऱ्या 'झॉलीवूड' (Zollywood) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कारप्राप्त 'झॉलीवूड' हा सिनेमा 3 जून रोजी प्रदर्शित होत आहे. पहिल्यांदाच झाडीपट्टी नाटकाचं खरंखुरं चित्रण या सिनेमात मांडण्यात आलं आहे. 


सिनेमा अस्सल झाडीपट्टीचा अनुभव देईल!


'झॉलीवूड' हा सिनेमा नव्या दमाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेनं दिग्दर्शित केला आहे. तृषांत या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. झाडीपट्टी नाटकांची विदर्भात प्रचंड लोकप्रियता आहे, त्या भागात झाडीपट्टी ही जणू स्वतंत्र इंडस्ट्रीच आहे. पण उर्वरित महाराष्ट्रात झाडीपट्टीविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे 'झॉलीवूड'मधून पहिल्यांदाच झाडीपट्टी सिनेमाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे. 'झॉलीवूड' हा सिनेमा बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे. राज्य पुरस्कारांमध्येही या चित्रपटानं नामांकनं मिळवली आहेत. 


झाडीपट्टी रंगभूमीवरच्या कलाकारांनीच साकारल्या सिनेमातील भूमिका


झाडीपट्टी रंगभूमीवरच्या कलाकारांनीच या सिनेमातील भूमिका साकारल्या आहेत हे महत्त्वाचं वैशिष्ट्य. झाडीपट्टी नाटक करताना येणाऱ्या अडचणी, नाटकासाठी अभिनेत्री म्हणून मुलगी न मिळणं, नाटकाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, नाटक करतानाचे वादविवाद अशी धमाल या सिनेमात असल्याचं ट्रेलरमधून दिसून येतं. मात्र मातीशी जोडलेलं दमदार कथानक, अस्सल विदर्भीय भाषा, खरेखुरे कलाकार या चित्रपटात असल्यानं चित्रपटाला विदर्भीय सुगंध आहे. म्हणून चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता ३ जूनला चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षी आहे.


विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, अमित मसूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तर ‘न्यूटन’, ‘शेरनी’, ‘सुलेमानी किडा’ असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मसूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट नव्या दमाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेनं दिग्दर्शित केला आहे. 


विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. त्यामुळे 'झॉलीवूड'मधून पहिल्यांदाच झाडीपट्टी चित्रपटाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे.


संबंधित बातम्या