मुंबई : गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ करण जोहरच्या पार्टीचा होता. या पार्टीत दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, शाहिद कपूर, वरुण धवन, अयान मुखर्जी, रणबीर कपूर यांच्यासह इतरही अनेक लोक दिसून आले होते. हा व्हिडीओ स्वतः करण जोहरने शूट केला होता. गेल्या वर्षी व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्ज पार्टी करत असल्याचं बोललं जात होते. तसेच व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सेलिब्रिटींची अवस्था पाहून ते नशेत असल्याचंही बोलंलं जात होतं.


व्हायरल व्हिडीओवरून अनेक वादविवाद झाल्यानंतर करण जोहरने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं की, 'जर त्याच्या पार्टीत ड्रग्जचा वापर करण्यात आला असता, तर त्याने स्वतः हा व्हिडीओ का शूट केला असता.' काही दिवस हा व्हिडीओ चर्चेत राहिला तसचे यासंदर्भात तपास करण्यात यावा अशी मागणीही केली जात होती. त्यानंतर मात्र सर्वांना या व्हिडीओचा विसर पडला. आता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर मात्र संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. अशातच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच या दोघांनी दिलेल्या जबाबामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


मंजिंदर सिंह सिरसा आणि खासदार नवनीत राणा यांनी केली तपासाची मागणी


बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणी सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा नंतर श्रद्धा कपूरचं नावही समोर आलं आहे. यावरून संसदेतही गोंधळ निर्माण झाला. आता शिरोमणी अकाली दलाचे नेते मंजिंदर सिंह सिरसा आणि महाराष्ट्राचने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही करण जोहरच्या पार्टीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी केली आगे. नवनीत राणा स्वतःही एक अभिनेत्री होत्या. त्यांनी तेलगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे.


मंजिंदर सिंह सिरसा यांचं ट्वीट :





मुंबई पोलीस कमिश्नरांकडे तक्रार


गेल्या वर्षी मंजिंदर सिंह सिरसा यांनी करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं की, 'उडता बॉलिवूड - फिक्शन बनाम रियलिटी, पाहा बॉलिवूडमधील उच्च आणि पराक्रमी लोक कोणत्या ड्रग्जचं साम्राज्य चालवत आहेत. मी माझा आवाज या स्टार्सच्या ड्रग्ज वापराविरोधात उचलत आहे.' सिरसा यांनी त्यावेळी मुंबई पोलीस कमिश्नरांकडे तक्रारही दाखल केली होती. परंतु, यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.


महत्त्वाच्या बातम्या :