मुंबई : पवना डॅम येथील बोट चालक जगदीश दासनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला महत्त्वाची माहिती दिली आहे. पवना डॅम जवळ असलेल्या सुशांतच्या फार्महाऊसवर रिया चक्रवर्ती,सारा अली खान आणि श्रद्धा कपूर पार्टीसाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे.


सुशांत सिंग प्रकरणात ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती आता महत्त्वाच्या माहिती लागत आहेत. पवना डॅम जवळ असलेल्या सुशांतच्या फार्महाऊसवर सुशांत नेहमी जायचा. तिथे गेल्यावर सुशांत कधी कधी बोटिंग करायचा जिथे सुशांत खुप वेळ बसायचा.


2011 पासून जगदीश दास पावना डॅम येथे मोटर बोट चालवण्याचं काम करतो. 2018 मध्ये अब्बास आणि रमजान अलीने जगदीशला फोन करून सांगितलं की, पवना डॅम फिरायचं आहे म्हणून जरीन खानच्या बंगल्यावर त्याला बोलवलं (जे आता हँग आऊट वीला आहे).


त्यानंतर सुशांत सिंह राजपूत आणि अब्बास अली माझ्या बोटवर आले होते. ते डॅमच्या मधोमध गेले आणि पोहायला लागले, पोहून झाल्यावर मी दोघांना पुन्हा घेऊन आल्यानंतर त्यांनी मला 16 हजार रुपये रोख रक्कम दिली. त्यानंतर ते मध्ये वेळ काढून पवना डॅमला यायचे आणि वेळ मिळेल तेव्हा बोटिंग करायचे आणि आपती गवंडे टापु वर जाऊन तासंन तास बसायचे.


जगदीश दासने एनसीबीला दिलेल्या माहिती प्रमाणे सारा अली खान, रिया चक्रवर्ती आणि श्रद्धा कपूर येथे फिरायला यायच्या मात्र ते एकत्र कधीच आले नाहीत. कधी-कधी रिया आणि सुशांत तासंन तास टापू वर बसायचे. तर एकदा श्रद्धा कपूर सुद्धा सुशांत सोबत आली होती. तर सारा अली खान तीन ते चार वेळा सुशांत सोबत माझ्या बोटीवर आली आणि टापू वर जाऊन पार्टी केल्याची माहिती सुद्धा जगदीशने एनसीबीला दिली.


पवना डॅम येथे होणाऱ्या पार्ट्यांचे रहस्यांच जगदीशकडून खुलासा


सुशांत कधीकधी आपल्या पूर्ण टीम सोबत सुद्धा पवना डॅम येथे पार्टीला जायचा .ज्यामध्ये सारा अली खान, सिद्धार्थ पीठाने, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा, रिया, श्रद्धा कपूर या सर्वांचा समावेश आहे. ही लोक तासंन तास टापूवर बसून दारू प्यायचे, गांजा ओढायचे आणि पूर्ण पणे नशेच्या आहेरी जायचं. मात्र यांच्या खाजगी आयुष्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे जगदीश दास यांनी एनसीबीला सांगितलं. त्यामुळे ज्या कलाकारांची नावे आता एनसीबीच्या चौकशीमध्ये समोर आली आहेत. त्यांना चौकशीसाठी एनसीबीकडून नोटीस बजावण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :