Sidhu Moose Wala : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि कॉंग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांना ओळखले जायचे.
बॉलिवूड अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन कपिल शर्माने (Kapil Sharma) ट्वीट करत लिहिले आहे,"सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात येणे हे खूप धक्कादायक आणि दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो". हिमांशी खुराणानेदेखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
पंजाबी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम शहनाज गिललादेखील सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे. यासंदर्भात शहनाजने पंजाबी भाषेत आपल्या भावना व्यक्त करत दु:ख व्यक्त केले आहे.
भगवंत मान आणि करण कुंद्राने यांनी ट्वीट करत लिहिले आहे, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने मला धक्का बसला आहे. विशाल ददलानीने ट्वीट करत लिहिले आहे, सिद्धू मुसेवाला एक चांगले कलाकार होते. झरीन खाननेदेखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
सिद्धू मुसेवाला रातोरात झाले स्टार
सिद्धू मुसेवाला यांनी गीतकार म्हणून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'लायसेन्स' असे त्याच्या पहिल्या गाण्याचे नाव होते. हे गाणं पंजाबी गायक निंजा यांनी गायले आहे. 'सो हाई' या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना लोकप्रियता मिळाली. या गाण्यामुळे सिद्धू मुसेवाला यांचे नाव जगभरात ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे सिद्धू रातोरात स्टार झाले. सिद्धू मुसेवाला यांच्या 'सो हाई' या गाण्याला यूट्यूबवर 477 मिलिअन व्हूयूज मिळाले आहेत.
संबंधित बातम्या