Sharad Ponkshe On Lok Sabha Election 2024 : एखाद्या राजकीय पक्षाकडून विचारणा झाली तर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवायला मला आवडेल, असं वक्तव्य मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केलं आहे. एबीपी माझाच्या 'मी खासदार झालो तर' (Me Khasdar Zalo Tar) या सेगमेंटमध्ये मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत तसेच सध्याचं राजकारणाबद्दल (Maharashtra Politics) प्रश्न विचारण्यात येतात. आता शरद पोंक्षे यांनी कोणत्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायला आवडेल याबद्दल रोखठोक वक्तव्य केलं आहे.


शरद पोंक्षे मराठी मनोरंजनसृष्टीत सक्रीय असण्यासोबत समाजकार्यातही सक्रीय आहेत. अभिनय, व्याख्याने तर कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या शरद पोंक्षेंनी एबीपी माझाशी बोलताना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शरद पोंक्षे अभिनयक्षेत्रासह राजकारणातदेखील (Maharashtra Politics) सक्रीय आहेत. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात (CM Eknath Shinde) प्रवेश केला होता. शरद पोंक्षे शिवसेनेचे (Shiv Sena) उपनेते आहेत. 


मी खासदार झालो तर... (Sharad Ponkshe on Member Of Parliament) 


एबीपी माझाच्या 'मी खासदार झालो तर' (Me Khasdar Zalo Tar) या सेगमेंटमध्ये शरद पोंक्षे म्हणाले,"एखाद्या राजकीय पक्षाकडून विचारणा झाली तर मला लोकसभा निवडणूक लढवायला आवडेल. मी राहतोय तो मतदारसंघ बोरिवली (Borivali) आहे. त्यामुळे बोरीवली मतदारसंघातून निवडणूक लढवायला मला आवडेल. माणसाने जिथे राहतो तिथूनच लढावं. तिथल्या परिसरातले लोक तुम्हाला वर्षानुवर्षे ओळखत असतात. कुठेतरी भलत्याच ठिकाणी उभं राहिलो तर तिथले माणसं आपल्याला ओळखत नाहीत. आपण आपल्या परिसरातल्या लोकांसाठी लढावं. आपण जे काही केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. मग मत द्याचं की नाही हा निर्णय लोक घेतील". 


सध्याच्या राजकारणाबद्दल शरद पोंक्षेची प्रतिक्रिया (Sharad Ponkshe Reaction on Maharashtra Polotics)


सध्याच्या राजकारणाबद्दल प्रतिक्रिया देताना शरद पोंक्षे म्हणाले,"महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आताचं राजकारण खूपच भयानक सुरू आहे. सर्व पातळ्या सोडून राजकारण सुरू आहे. सुसंस्कृतपणाचा लवलेशही नाही. पण अशा सर्व स्टेजमधून सर्व क्षेत्र जात असतात. कोणतीही स्टेज कायमस्वरुपी राहत नाही. म्हणूनच 2024 ची निवडणूक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक असणार आहे". शरद पोंक्षे सध्या सिक्कीममध्ये आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहेत. 


संबंधित बातम्या


Sharad Ponkshe : "मी ब्राह्मण आहे, माझ्या घरीदेखील नगरपालिकावाले आले होते"; जात सर्वेक्षणाबद्दल शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत