Kantara: सध्या 'कांतारा' (Kantara) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं बॉक्स कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. आता पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुननं देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
अल्लू अर्जुनचं ट्वीट
अल्लू अर्जुननं ट्विटरवर कांतारा चित्रपटाचं पोस्ट शेअर केलं. त्यानंं ट्वीटमध्ये लिहिलं, 'कांतारा हा एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव आहे जो कोणीही मिस करु नये, मनमोहक बॅकग्राउंड स्कोअर, चित्तथरारक सिनेमॅटोग्राफी, ऋषभ शेट्टी द्वारे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनय. चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून माझ्या अंगावर शहारे आले आणि मी भावूक झालो. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन!'
चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
कांतारा या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं केवळ 8 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 17 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटानं 170 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. कांतारा हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 'कांतारा'मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. 'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. ज्यामध्ये ऋषभ शेट्टीने लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. अनेक कलाकांनी कांतारा या चित्रपटाचं कौतुक केलं. चित्रपटाचं कन्नड व्हर्जन ब्लॉकबस्टर ठरलं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या
Kantara : ‘याला म्हणतात खरा चित्रपट...’; ‘कांतारा’ पाहून इम्प्रेस झाली कंगना रनौत!