Shiv Kumar Khurana passes away:  बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक  शिव कुमार खुराना (Shiv Kumar Khurana) यांचे निधन झाले आहे.  मुंबईमधील ब्रह्मकुमारी ग्लोबल रुग्णालयात वयाच्या  83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1999 मध्ये रिलीज झालेल्या जालसाज या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. 


जवळपास 35 वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केले. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, जरीना वहाब, कमाल सदना ते कादर खान, सदाशिव अमरापूरकर, रझा मुराद आणि अनुपम खेर या कलाकारांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. 


अभिनेते विनोद खन्ना यांना नायकाची भूमिका साकारण्याची दिली संधी
शिव कुमार खुराना  यांनी त्यांच्या चित्रपटात विनोद खन्ना यांना नायकाची भूमिका साकारण्याची पहिली संधी दिली. सुनील दत्त यांच्या होम प्रोडक्शनद्वारे निर्मित  मन का मीत या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण त्यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर विनोद खन्ना यांना केवळ खलनायकाच्या भूमिकेसाठीच चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या पण शिव कुमार खुराना  यांनी त्यांच्या चित्रपटात विनोद खन्ना यांना हिरोची भूमिका साकारण्याची संधी दिली. शिव कुमार खुराना यांच्या 1971 मध्ये रिलीज झालेल्या हम तुम और वो या चित्रपटात विनोद खन्ना यांनी नायकाची भूमिका साकारली. 


विंदू दारा सिंहला बॉलिवूडमध्ये केलं लाँच


शिव कुमार खुराना यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मिट्टी और सोना, 'फर्स्ट लव लेटर', 'बदनाम', 'बदनसीब', 'बे आबरू', 'सोने की जंजीर' आणि 'इंतकाम की आग' या चित्रपटांचे दिग्दर्शन शिव कुमार खुराना यांनी केले आहे.  'हम तुम और वो', 'दगाबाज'  आणि 'अंग से अंग लगाले'  या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. त्यांनीच कुस्तीपटू आणि अभिनेता दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंह याला 1994 मध्ये रिलीज झालेल्या करण चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. शिव कुमार खुराना यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 28 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!