बंगळुरु : कन्नड टीव्ही अभिनेत्री रेखा सिंधूचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. चेन्नई-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 23 वर्षीय रेखाला प्राण गमवावे लागले.


रेखा सिंधू बंगळुरुतील बनसवाडी भागात राहत होती. शुक्रवारी तिघा जणांसह ती चेन्नईहून बंगळुरुला जात होती. पर्णमबूत भागात कारची धडक बसून झालेल्या अपघातात चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण 20 ते 23 वयोगटातील होते.

मॉडेल, अभिनेत्री रेखा सिंधूने मालिकांसोबतच काही जाहिरातींमध्येही काम केलं होतं. तामिळ आणि कानडी टीव्ही मालिकांमध्ये तिच्या भूमिका गाजल्या होत्या. तिच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अभिनेत्री रेखा कृष्णाप्पा यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे सुरुवातीला अनेकांचा गोंधळ उडाला. मात्र रेखा कृष्णाप्पा यांनी फेसबुकवरुन आपण सुस्थितीत असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.