मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर तिच्याविरोधात सर्व स्तरांतून टिका केली जात असून तिचा वक्तव्याचा निषेधही व्यक्त करण्यात आला. परंतु, आता कंगनाने मुंबईचा थेट पाकिस्तान असा उल्लेख केला आहे. आज मुंबई महापालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई करण्यास सुरुवात केली. कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईचे फोटो ट्वीट करत कंगनाने 'पाकिस्तान' असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, कंगनाच्या कार्यालयावर केली जाणारी कारवाई मुंबई महानगरपालिकेकडून तूर्तास थांबवली आहे.
कंगनाचं ट्वीट :
कंगना रनौतने तिच्या कार्यालयाच्या आतमध्ये केल्या जाणाऱ्या तोडक कारवाईचे फोटो ट्वीट करुन 'पाकिस्तान'असं कॅप्शन दिलं आहे. शिवाय #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे. कंगना रनौतने आपल्या ट्वीटची मालिका सुरुच ठेवली आहे. आधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणाऱ्या कंगनाने महापालिकेच्या कारवाईनंतर आता थेट मुंबईला पाकिस्तान असं संबोधलं आहे.
अभिनेत्री कंगना रनौत आज मुंबईत दाखल होणार आहे. ती चंदीगडहून मुंबईसाठी निघाली आहे. त्याचवेळी मुंबईत महानगरपालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यावर कंगना रनौतने ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बाबरची आर्मी असं संबोधलं आहे. तसेच आपलं ऑफिस राम मंदिर असल्याचं म्हटलं आहे.
कंगनाचं ट्वीट :
कंगना रनौतनं ट्वीट करत म्हटलं आहे की, ''मणिकर्णिका फिल्म्ज'मध्ये 'अयोध्या'ची घोषणा केली होती. ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिरच आहे, आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल, राम मंदिर पुन्हा पडणार. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनणार, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम.'
दरम्यान, कंगनाच्या कार्यालयाच्या बांधकामाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मुदत दिली होती. महापालिका सगळ्यांना वेळ देते. अवैध बांधकामावर कारवाई केली नाही तर तुम्हीच बोलणार. ही कारवाई अवैध बांधकामावरच होत आहे. नियमित बांधकामावर होत नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारवाईबाबत दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
- महापालिकेने पाडकाम केल्यावर कंगनाचा ट्विटरवर थयथयाट; पालिकेला म्हणाली बाबरची आर्मी
- कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात
- बीएमसीने कंगनाला पाठवलेली नोटीस बेकायदेशीर; कंगना रनौतच्या वकिलांचा आरोप
- कंगना रनौतच्या ऑफिसला महापालिकेकडून नोटीस; रहिवाशी जागेचा कार्यालयीन वापर केल्याचा कंगनावर ठपका
- ना डरूंगी, ना झुकूँगी.... मुंबईत येण्यापूर्वी कंगना रनौतचं ट्वीट
- 'मुंबाई मातेचा अवमान करणारे बेइमान', सामनातून टीका, कंगनानंही दिलं उत्तर