चित्रपटाच्या ट्रेलर दमदार आहेच, त्याहून दमदार कंगनाचा अभिनय आहे. ट्रेलरमध्ये कंगना तलवारबाजी करताना, तिरंदाजी करताना, घोडेस्वारी करताना सर्वांचे लक्ष वेधून घेते. "हम लढेंगे, और छत्रपती शिवाजी महाराज के स्वराज के सपनेको पुनर्जिवित करेंगे", कंगनाच्या या डायलॉगने तर पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. चित्रपटात असे अनेक दमदार डायलॉग असणार हे, ट्रेलरमधूनच दिसते.
मणिकर्णिकाची "अडथळ्यांची शर्यत"
कंगनाच्या मणिकर्णिका या चित्रपटाने आतापर्यंत अनेक अडथळे पार केले आहेत. सुरुवातीला या चित्रपटाच्या कथानकाला विरोध करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शक क्रिशने हा चित्रपट अर्ध्यावरच सोडला. त्यानंतर कंगनाने दिग्दर्शनाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. परंतु त्यानंतर अभिनेता सोनू सूदने हा चित्रपट मध्येच सोडून कंगनाला अजून एक धक्का दिला. त्यानंतर कंगनाच्या अजून एका सहकलाकाराने हा चित्रपट अर्ध्यावर सोडला. असे अनेक अडथळे पार करत अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
या चित्रपटात अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डॅनी डेन्झोपा, कुलभूषण खरबंदा यांच्यादेखील भूमिका आहेत. परंतु ट्रेलरवरुन हा चित्रपट सबकुछ कंगना असाच असेल.