Kangana Ranaut Wedding Update : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतीच करण जौहरच्या 'रामायण' सिनेमाच्या कास्टिंगबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती. आता पंगाक्वीनबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये कंगना पापराझींना लग्न पत्रिका वाटताना दिसत आहे. 


कंगनाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे? (Kangana Ranaut Viral Video) 


कंगनाचा व्हायरल व्हिडीओ हा तिच्या ऑफिसबाहेरचा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक पत्रकार म्हणत आहे,"तुम्ही पाहू शकता की कंगनाचं ऑफिस सजलेलं आहे. खरचं कंगना लग्न करतेय?". दरम्यान पंगाक्वीनची एन्ट्री होते आणि मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देत ती म्हणते,"बातम्या तर तुम्ही पसरवता? मी फक्त आनंदाची बातमी देते. तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.. नक्की या". 






कंगनाने पापराझींना लग्न पत्रिकादेखील दिली आहे. या पत्रिकेवर 'टीकू वेड्स शेरू' असं लिहिलेलं आहे. पापराझींना लग्न पत्रिका देतानाचा व्हिडीओ शेअर करत कंगनाने तिच्या 'टीकू वेड्स शेरू' या सिनेमाचं प्रमोशन केलं आहे. कंगनाच्या या व्हिडीओनंतर ती लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पण कंगना आता लग्न करत नसून तिच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करत आहे. 


कंगनाचा 'टीकू वेड्स शेरू' कधी प्रदर्शित होणार? (Tiku Weds Sheru Release Date)


'टीकू वेड्स शेरू' या सिनेमाच्या माध्यमातून कंगना सिने-निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. अवनीत कौर (Avneet Kaur) आणि नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर साई कबीरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'टीकू वेड्स शेरू' हा सिनेमा 23 जूनला प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अवनीत कौर आणि नवाजु्द्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 


कंगनाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Kangana Ranaut Upcoming Project) 


'पंगाक्वीन' कंगना रनौतचा 'इमरजेंसी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असण्यासोबत ती या सिनेमाचं दिग्दर्शनदेखील करणार आहे. तसेच राघव लॉरेंसच्या 'चंद्रमुखी 2' या सिनेमातदेखील ती दिसणार आहे. तसेच 'द अवतार:सीता' हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  


संबंधित बातम्या


Tiku Weds Sheru : Kangana Ranaut करणार सिने-निर्मिती व्यवसायात पदार्पण, सिनेमात Nawazuddin Siddiqui असणार मुख्य भूमिकेत