Disha Patani Birthday Special : 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी 2' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दिशा आज बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री असली तरी अभिनेत्री होण्याचं तिने कधी ठरवलं नव्हतं. 


दिशा पटानीचा जन्म 13 जून 1992 रोजी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये झाला आहे. सलमान खान, टायगर श्रॉफसारख्या बड्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या दिशाने कधीच अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. दिशा आणि अभिनय क्षेत्राचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता. 


दिशाला काय व्हायचं होतं? 


दिशाने शास्त्रज्ञ होण्याचं बालपणीच ठरवलं होतं. त्यादृष्टीने पाऊल उचलत तिने लखनऊमधील एमिटी युनिवर्सिटीमधूल इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयात असताना तिने मॉडेलिंगमध्ये काम करायला सुरुवात केली आणि हाच तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. 


वयाच्या 17 व्या वर्षी दिशाने पहिलं फोटोशूट केलं आणि ग्लॅमरस जगासोबत ती जोडली गेली. 2015 साली तिने एका जाहिरातीच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली. दरम्यान 2015 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'लोफर' या तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून तिला पहिला ब्रेक मिळाला. तिचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 


'या' सिनेमांनी दिशाला केलं सुपरस्टार


'लोफर' या सिनेमानंतर दिशा पटानी रातोरात स्टार झाली. त्यानंतर 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' (M.S. Dhoni: The Untold Story) या सिनेमाच्या माध्यमातून 2016 साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली होती. आपल्या पहिल्याच सिनेमाने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मीडिया रिपोर्टनुसार, फक्त 500 रुपये घेऊन दिशाने मुंबई गाठली होती.






दिशा पटानी आज बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करणाऱ्या दिशाने 'बागी 2', 'मलंग', 'भारत', 'राधे योर मोस्ट वांटेड भाई' सारख्या गाजलेल्या सिनेमांत दिशाने काम केलं आहे. तिचा 'योद्धा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Disha Patani: तुम हुस्न परी; दिशा पटानीच्या नव्या लूकवर चाहते घायाळ!