WB post-poll violence : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचारात 9 जाणांना प्राण गमवावे लागले. याचे पडसाद साऱ्या देशात उमटत असून, विविध स्तरांतून या हिंसाचाराचा निषेध केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही असाच सूर आळवला. विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांना बंगालच्या जनतेनं जोरदार बहुमत प्राप्त करुन दिलं आहे. पश्चिम बंगालचा निर्णय़ हा ऐतिहासिक आणि क्रांतीकारी आहे, पण तिथं निवणडणुकांनंतर झालेला हिंसाचार ही गंभीर बाब असल्याची भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली. 


'सध्याची परिस्थीती पाहता सर्वच राजकीय पक्षांनी संयम बाळगणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षावर याची मोठी जबाबदारी असते. सध्या केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता आहे. दुर्दैवानं पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास हा रक्तरंजित हिंसाचारानं भरलेला आहे. हे खरं असलं तरीही देशाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळं सर्वांनी आता राजकीय वाद मिटवणं गरजेचं आहे', असं ते म्हणाले. 


राजकीय पक्षांकडून एकमेकांना धमक्या देणं बंद झालंच पाहिजे असं म्हणत निवडणूक संपल्यानंतर सर्व वादळ शमतं आणि नव्या पर्वाला सुरुवात होते याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला कोण खतपाणी घालत आहे, हे स्थानिक पातळीवर होत आहे की बाहेरुन या गोष्टींना दुजोरा दिला जात आहे यावर लक्ष देणं गरजेचं आहे असा आग्रही सूर संजय राऊत यांनी आळवला.  


IN PICS : केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? 


अदर पुनावाला धमकी प्रकरणी म्हणाले....


अदर पुनावाला यांनी स्वत: या मुदद्द्यावर स्पष्टीतकरण देत लसीकरणाबाबतचं आपलं म्हणणं चुकीच्या पद्धतीनं मांडल्याची बाब स्पष्ट केली. याचा दाखला देत पुनावाला यांना महाराष्ट्रातून त्यांना कोणीही धमकावलेलं नाही ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असं ते म्हणाले. उलटपक्षी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या लसींची निर्मिती केली जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, असं संजय राऊत म्हणाले. धमक्यांसंदर्भात पुनावाला यांनी केलेलं वक्तव्य गंभीर आहे. लसीकरणाबाबत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.