Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. सामाजकारण, राजकारण अशा विविध विषयांवर ती व्यक्त होत असते. आता बॉलिवूडची 'पंगाक्वीन' पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.


कंगना रनौत नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा तिच्यावर टीका होत असते. कंगना राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशातच आता अभिनेत्रीचे वडील अमरदीप रनौत यांनी कंगनाच्या राजकारण एन्ट्रीबद्दल भाष्य केलं आहे.


कंगना रनौतचे वडील काय म्हणाले?


कंगना रनौत लोकसभा निवडणूक 2024 लढणार का यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंगना रनौतचे वडील अमरदीप रनौत यांनी नुकतचं एका मुलाखतीत त्यांची लेक भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे". 


अमरदीप रनौत पुढे म्हणाले,"कंगना रनौत कोणत्या भागातून निवडणूक लढवणार याचा निर्णय पार्टी घेईल. कंगना रनौतचं कुल्लू येथील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. कंगना रनौतने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्या कामाचंही त्यांनी कौतुक केलं आहे.


कंगनाने राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल काही दिवसांपूर्वी भाष्य केलं होतं. अभिनेत्री म्हणालेली,"कलाकार असल्यामुळे राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल मी खूप इच्छुक आहे. पण सध्या तरी मी राजकारणात एन्ट्री करणार नाही. भारत देश प्रत्येक दिवशी प्रगती करत आहे".






कंगना रनौतच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Kangana Ranaut Upcoming Movies)


कंगना रनौतचा 'तेजस' (Tejas) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. अभिनेत्री सध्या 'इमरजेन्सी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती माजी प्रंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पंगाक्वीन 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. 


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : कंगना रनौतची राजकारणात एन्ट्री? म्हणाली,"2024 च्या निवडणुकीत फक्त भगवा रंग..."