Vishal Nikam Viral Video: अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) हा सध्या त्याच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. नुकताच विशालनं त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये विशाल हा एका चाहत्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. विशालचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विशालचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 


विशालनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, एक चाहता विशालसोबत सेल्फी काढण्यासाठी थांबला आहे. त्या चाहत्याकडे बटणांचा मोबाईल आहे. विशाल हा त्याच्या चाहत्याचा मोबाईल घेतो आणि मोबाईलच्या बॅक कॅमेऱ्याने त्या चाहत्यासोबत सेल्फी काढतो. त्यानंतर विशालच्या चाहत्याला आनंद होते. विशालनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, "जो भी चाहूं वो मैं पाऊं ज़िंदगी में जीत जाऊं  और मुझे लगता हैं भगवान कि कृपा से मुझे जो चाहिये, मुझे मिल गया है, असच प्रेम आणि तुमची साथ कायम माझासोबत राहू द्या" विशालच्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी विशालचे कौतुक केले आहे.


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


विशालनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'गरिबीची जाण असलेली विशाल मनाचा माणूस विशाल निकम' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "विशाल भाऊ बिग बॉसमध्ये असताना तर मन जिंकलं पण आज परत एकदा मन जिंकलं. भाऊ सर्वसाधारण लोकांसोबत  आज मोबाइलमध्ये जो सेल्फी घेतलास, एक नंबर" विशालनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


पाहा व्हिडीओ:






विशाल निकम हा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा विजेता ठरला. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिथुन या चित्रपटामध्ये विशालने महत्वाची भूमिका साकारली. 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेतील विशालच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेमुळे विशालला लोकप्रियता मिळाली. तसेच 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेमध्ये देखील विशालने महत्वाची भूमिका साकारली. आता वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटामधून विशाल निकम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Vishal Nikam : ज्योतिबाची भूमिका ते बिग बॉस; सांगलीकर विशाल निकमचा भन्नाट प्रवास