Shubhneet Singh : गायक आणि रॅपर

  शुभनीत सिंह (Shubhneet Singh) हा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी शुभनीत सिंह हा त्याच्या पोस्टमुळे चर्चेत होता. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं खालिस्तानींना पाठिंबा दिला, असा आरोप अनेकांनी त्याच्यावर केला. पण आता शुभनीत हा एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कॉन्सर्टमध्ये शुभनीत हा एक हुडी प्रेक्षकांना दाखवतो. शुभनीतचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक अनेक लोक शुभनीतवर टीका करत आहेत.


'ती' हुडी दाखवणं पडलं महागात (Shubhneet Singh Viral Video)


शुभनीत सिंहच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शुभनीत हा प्रेक्षकांना एक हुडी दाखवत आहे. या हुडीवर छापलेल्या चित्रात सतवंत सिंह आणि बेअंत सिंह हे  इंदिरा गांधींची हत्या करताना दिसत आहेत, असं म्हटलं जात आहे.   शुभनीत सिंहनं ही हुडी कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना दाखल्यामुळे आता अनेक जण शुभनीतला ट्रोल करत आहेत.  


कंगना शुभनीत सिंहवर भडकली (Kangana Ranaut)


कंगनानं ट्वीटच्या माध्यमातून शुभनीत सिंहवर टीका केली आहे. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, "जेव्हा तुमच्यावर संरक्षण करण्याचा विश्वास ठेवला जातो, परंतु तुम्ही त्या विश्वासाचा फायदा घेत ज्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचा वापर  त्यांना मारण्यासाठी केला. हे शौर्याचे कृत्य नसून भ्याडपणाचे लज्जास्पद कृत्य आहे. नि:शस्त्र असलेल्या एका वृद्ध महिलेवर अशा भ्याड हल्ल्याची लाज वाटली पाहिजे. त्या लोकशाहीत निवडून आलेल्या एक महिला होत्या, शुभम जी इथे गौरव करण्यासारखे काही नाही. थोडी लाज बाळगा!"






कंगना ही लवकरच 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे. 


संबंधित बातम्या:


Shubhneet Singh : "पंजाब माझ्या रक्तात आहे"; 'त्या' पोस्टवर अखेर शुभनीत सिंहनं सोडलं मौन