मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने गेल्या वर्षभरात केलेल्या ट्वीट, व्हिडीओवरुन अंदाज लावला जात होता की कंगना राजकारणात प्रवेश करते की काय. मात्र मला राजकारणात रस नसल्याचं कंगनाने म्हटलं आहे. काल मुंबईत तिच्या आगामी ‘थलायवी’ चित्रपटाचं ट्रेलर लाँचिंग करण्यात आलं त्यावेळी ती बोलत होती. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल सतत भाष्य करणारी आणि महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधणारी कंगना एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाली, माझ्यासाठी राजकारणाचे क्षेत्र नवीन आहे. जर मी  देश आणि राष्ट्रवादाबद्दल बोलतो किंंवा मी शेतकर्‍यांच्याविषयी, कृषी कायद्यांविषयी बोलतो, ज्याचा थेट परिणाम माझ्यावर होतो. मला बोललं जातं की मी राजकारणात जाणार आहे. मात्र तसं काहीही नाही.


कंगना पुढे म्हणाली की, एक नागरिक म्हणून मी सर्व गोष्टींवर माझं मत मांडते. मात्र राजकारणाशी माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही. मी राष्ट्रवादावर कसं बोलू शकते, याबद्दल लोकांना खूप राग येतो. किंवा मला अशी काय गरज पडली की मी कृषी कायद्यांविषयी बोलले पाहिजे? असा लोकांना प्रश्न पडतो. मी सर्व विषयांवर कशी बोलू शकते? असं त्यांना वाटतं. या गोष्टी त्यांना खटकल्या आणि त्यांनी जे काही केलं ते सर्वांनी पाहिलं. 


National Film Awards 2021 | 'हे' आहेत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फटकारताना बनवलेल्या व्हिडीओशी संबंधित प्रश्नावर बोलताना कंगनाने म्हटलं की, त्यावेळी बर्‍याच गोष्टी घडत होत्या. असं दिसत होतं की रील आणि रिअल लाईफ दोन्ही एकत्र होत होत्या. देशाचा इतिहास असा आहे की ज्याने एखाद्या महिलेचा अपमान केला आहे त्याची हार निश्चित आहे. इतिहास यासाठी साक्ष आहे. रावणाने सीतेचा अपमान केला होता, कौरवांनी द्रौपदीचा अपमान केला होता. मी या देवींपैकी एकही नाही मात्र मी एक सामान्य स्त्री आहे. 


Happy Birthday Kangana Ranaut | कंगना रनौतला वाढदिवसाच्या आधीच मिळालं राष्ट्रीय पुरस्काराचं गिफ्ट


मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थलायवी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यासाठी कंगना एका विन्टेज कारने तेथे पोहोचली होती. यावेळी तिथे साडी नेसली होती आणि केसात गजरा लावला होता. ज्यावेळी हा सिनेमा ऑफर झाला त्यावेळी स्वत:वर विश्वास नव्हता की मी जयललिता यांच्या सारखी दिसेल की नाही. एवढी मोठी भूमिका निभावेल की नाही, असं कंगनाने म्हटलं.